प्रख्यात कन्नड साहित्यिक एस. एल. भैरप्पा यांचे निधन… भैरप्पा यांच्या निधनाने भारतीय साहित्यातील एक अमूल्य स्तंभ हरपला – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

22

बंगळुरू : प्रख्यात कन्नड साहित्यिक एस. एल. भैरप्पा यांचे आज बंगळुरू येथील रुग्णालयात हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते ९४ वर्षांचे होते. रुग्णालयाने जाहीर केलेल्या प्रसिद्धी पत्रकानुसार, भैरप्पा यांना दुपारी २:३८ वाजता हृदयविकाराचा झटका आला होता. यांच्या निधनाने भारतीय साहित्यातील एक अमूल्य स्तंभ हरपला अशा भावना उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केल्या.

चंद्रकांत पाटील यांनी म्हटले, प्रख्यात कन्नड साहित्यिक एस. एल. भैरप्पा यांच्या निधनाने भारतीय साहित्यातील एक अमूल्य स्तंभ हरपला आहे. त्यांच्या कादंबऱ्या म्हणजे तत्त्वज्ञान, सौंदर्यशास्त्र आणि मानवी भावनांचा अद्वितीय संगम. ज्यामुळे वाचकांवर त्यांच्या लेखनाचा अमिट ठसा आहे. भैरप्पा यांचे साहित्य सामाजिक व राजकीय समज पक्की करणारे, भारतीय परंपरा व हिंदुत्व यांचे सखोल दर्शन घडवणारे होते. त्यांच्या निधनामुळे साहित्य आणि संशोधन क्षेत्रात निर्माण झालेली पोकळी कधीच भरून निघणार नाही. अशा शब्दात चंद्रकांत पाटील यांनी शोक व्यक्त करत श्रद्धांजली अर्पण केली.

एस. एल. भैरप्पा हे एक प्रसिद्ध कन्नड कादंबरीकार आणि पटकथा लेखक होते. एस.एल. भैरप्पा २५ वर्षांहून अधिक काळ कन्नड भाषेतील सर्वाधिक विक्री होणाऱ्या पुस्तकांच्या लेखकांपैकी एक होते. त्यांच्या अनेक पुस्तकांचे हिंदी आणि इतर भाषांमध्ये भाषांतर झाले आहे. त्यांच्या प्रमुख कादंबऱ्यांमध्ये वंशवृक्ष, पर्व, अवर्ण आणि तब्बलियु नीनाडे मगणे यांचा समावेश आहे. यापैकी अनेक कादंबऱ्यांचे चित्रपटांमध्ये रूपांतर झाले असून त्यांना मोठी लोकप्रियता मिळाली आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.