विद्यार्थ्यांमध्ये संशोधन वृत्ती विकसित करण्यावर भर द्या – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

सातारा : कोयना एज्युकेशन सोसायटी, पाटणच्या बाळासाहेब देसाई कॉलेज येथे B.Sc. Computer Science (Entire), B.Com (IT), M.Com (IT), BCA (AICTE), MKCL, आचार्य चाणक्य विकास केंद्र, अद्ययावत संगणक प्रयोगशाळा आणि नवीन विस्तारित इमारतीचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी चंद्रकांत पाटील यांनी सर्व उपस्थितांना शुभेच्छा दिल्या.
विद्यार्थ्यांमध्ये संशोधन वृत्ती विकसित करण्यावर भर देण्याची सूचना चंद्रकांत पाटील यांनी यावेळी केली. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना तंत्रज्ञान आणि संशोधनाच्या संधी उपलब्ध करून देणाऱ्या या उपक्रमाचे त्यांनी विशेष कौतुक केले.
या प्रसंगी आमदार डॉ. अतुलबाबा भोसले, सत्यजीत पाटणकर, अमरसिंह पाटणकर, याज्ञेसिंह पाटणकर, कोयना एज्युकेशन सोसायटीचे संजीव चव्हाण, शिवाजी विद्यापीठाचे माजी सिनेट सदस्य अमित कुलकर्णी, सुहास देशमुख, प्राचार्य एस. डी. पवार, तसेच संस्थेचे सर्व पदाधिकारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.