कोल्हापुरात ‘राजाभाऊ भोसले स्फूर्ती भवना’चे दिमाखदार लोकार्पण; मंत्री चंद्रकांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती

8

कोल्हापूर : लोक उत्कर्ष समितीतर्फे हिंदुराव घाडगे कॉलनी, कदमवाडी रस्ता येथे उभारण्यात आलेल्या ‘राजाभाऊ भोसले स्फूर्ती भवन’ या इमारतीचा लोकार्पण सोहळा उत्साहात संपन्न झाला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य सुहास हिरेमठ आणि पश्चिम महाराष्ट्र प्रांत संघचालक सुरेश जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडला.

राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी या सोहळ्याला विशेष उपस्थिती लावून सर्व स्वयंसेवकांचे अभिनंदन केले. यावेळी बोलताना मंत्री पाटील यांनी या इमारतीच्या कार्यामागील प्रेरणा, स्वयंसेवकांची संघटनशक्ती आणि समाजाभिमुख दृष्टिकोन यांचे मनापासून कौतुक केले. “समाजासाठी समर्पित भावनेने काम करणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी हे स्फूर्ती भवन आगामी काळात एक महत्त्वाचे केंद्र ठरेल,” असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. लोक उत्कर्ष समितीच्या या नवीन वास्तूमुळे सामाजिक कार्याला अधिक गती मिळणार आहे.

या कार्यक्रमाला विभाग संघचालक प्रतापसिंह दड्डीकर, विभाग सह-संघचालक भगतराम छाबडा, जिल्हा संघचालक डॉ. सूर्यकिरण वाघ, शहर संघ चालक प्रमोद ढोले, लोक उत्कर्ष समिती अध्यक्ष विद्यानंद देवधर यांची प्रमुख उपस्थिती होती.

Get real time updates directly on you device, subscribe now.