कोल्हापूर येथील क्रीडा संकुल रोडवर विद्यार्थिनींसाठी उभारण्यात आलेल्या वसतिगृहाचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न
कोल्हापूर : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते बुधवारी देशभक्त रत्नाप्पा कुंभार यांनी स्थापन केलेल्या काऊन्सिल ऑफ एज्युकेशन सोसायटीच्या वतीने कोल्हापूर येथील क्रीडा संकुल रोडवर विद्यार्थिनींसाठी उभारण्यात आलेल्या वसतिगृहाचे लोकार्पण करण्यात आले.

यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले, राज्य सरकारतर्फे मुलींचे उच्च शिक्षण मोफत करण्याचा निर्णय घेतल्याने राज्यातील मुलींचे शिक्षणातील प्रमाण लक्षणीय वाढले आहे. तसेच, शिक्षणातील इतर खर्च माफ करण्याचा प्रस्ताव विचाराधीन असून, ‘कमवा आणि शिका’ योजनेद्वारे गरजू विद्यार्थिनींना आर्थिक सहाय्य देण्याचा प्रयत्न आहे. यावेळी क्वालिटी ऑफ लाईफ सुधारण्यासाठी संस्थांनी लक्ष केंद्रित करावे, असे आवाहन पाटील यांनी केले.
या कार्यक्रमास संस्थेच्या अध्यक्षा रजनीताई मगदूम, उपाध्यक्ष डॉ. प्रसाद मगदूम, डॉ. विश्वनाथ मगदूम, ॲड. वैभव पेडणेकर, ॲड. अमित बाडकर, प्रा. डॉ. प्रवीण पाटील, प्रा. डॉ. वर्षा मैंदर्गी, प्रा. डॉ. उत्तम पाटील, प्रा. डॉ. भालचंद्र कुलकर्णी यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी, कर्मचारी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.