भाजपा नेते व व्यापारी आघाडीचे शहराध्यक्ष राजेंद्र चिंचवडे यांच्या निवासस्थानी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली सदिच्छा भेट
पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रातील प्रभाग क्रमांक १७ मधील भाजपा नेते व व्यापारी आघाडीचे शहराध्यक्ष राजेंद्र चिंचवडे यांच्या निवासस्थानी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधून त्यांना शुभेच्छा दिल्या.
चंद्रकांत पाटील म्हणाले, भाजपा हा कार्यकर्त्यांचा पक्ष असून प्रत्येक कार्यकर्त्याशी आपुलकीचं कौटुंबिक नातं आहे. हे नातं अधिक दृढ व्हावे आणि कार्यकर्त्यांनी जनसेवेच्या माध्यमातून पक्षसंघटन मजबूत करावे, असे आवाहन यावेळी पाटील यांनी केले.
या प्रसंगी आमदार शंकरभाऊ जगताप, भाजपा शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे, सदाशिव खाडे, मोरेश्वर शेडगे यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.