आई अंबाबाईच्या आशीर्वादाने मुरगूड नगरपरिषदेवर महायुतीचाच विजयाचा झेंडा फडकेल – मंत्री चंद्रकांत पाटील

45

कोल्हापूर : मुरुगूड नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीतील भाजपा–शिवसेना महायुतीच्या प्रचाराचा शुभारंभ आज उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते आई अंबाबाईच्या चरणी श्रीफळ वाढवून करण्यात आला.

आई अंबाबाईच्या आशीर्वादाने मुरगूड नगरपरिषदेवर महायुतीचाच विजयाचा झेंडा फडकेल, असा ठाम विश्वास व्यक्त करताना चंद्रकांत पाटील यांनी , माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली सर्व शिलेदार एकदिलाने काम करतील आणि मुरुगूडचा सर्वांगीण विकास साध्य करतील, अशी ग्वाही यावेळी सर्वांना दिली.

या प्रसंगी मंत्रिमंडळातील  कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर, माजी खासदार संजय मंडलिक, प्रवीण पाटील, संजय घाटगे, नाथाजी पाटील, महेश जाधव, नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सुहासिनी पाटील यांच्यासह सर्व उमेदवार आणि मुरगुडचे नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.