मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वडिलांच्या नावाने सुरू करण्यात आलेल्या “गंगाधरराव फडणवीस मेमोरियल डायग्नोस्टिक सेंटर”ला मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली सदिच्छा भेट
नागपूर : नागपूर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वडिलांच्या नावाने सुरू करण्यात आलेल्या “गंगाधरराव फडणवीस मेमोरियल डायग्नोस्टिक सेंटर” ला उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज सदिच्छा भेट देऊन विविध विभागांची सविस्तर पाहणी केली.

या अत्याधुनिक डायग्नोस्टिक सेंटरच्या माध्यमातून नागपूर शहरातील सर्वसामान्य, मध्यमवर्गीय तसेच गरजू नागरिकांना MRI, CT Scan, X-ray, Sonography आणि Dialysis अशा अत्याधुनिक वैद्यकीय तपासण्या परवडणाऱ्या दरात उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. खासगी रुग्णालयांच्या तुलनेत निम्म्याहून कमी दरात या सुविधा मिळत असल्यामुळे सर्वसामान्य नागपूरकरांना मोठा दिलासा मिळत असल्याचे पाटील यांनी म्हटले.
यामुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळत असून, आरोग्य क्षेत्रातील ही अत्यंत महत्त्वाची सेवा आहे. या केंद्रातून हजारो रुग्णांना प्रत्यक्ष लाभ होत आहे. आरोग्य व्यवस्थेची गुणवत्ता सातत्याने उंचावण्याचा प्रयत्न पुढेही सुरू राहील.