चंद्रकांत पाटील यांनी आज अकोल्यात भाजपाच्या संकल्प पत्रासाठी सामान्य जनतेकडून सूचना मागविण्याच्या अभियानाचा केला शुभारंभ

15
अकोला : लोकसभा निवडणूक-२०२४ मध्ये भाजपाचे संकल्प पत्र कसे असावे, यासाठी राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डाजी यांच्या मार्गदर्शनानुसार देशभरातील नागरिकांच्या सूचना मागविण्यात येत आहेत. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज अकोला दौऱ्या दरम्यान भाजपाच्या संकल्प पत्रासाठी सामान्य जनतेकडून सूचना मागविण्याच्या अभियानाचा शुभारंभ केला.
चंद्रकांत पाटील यांनी या वेळी म्हटले कि, लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देश झपाट्याने प्रगती करतो आहे. या विकासाच्या यात्रेत सहभागी होऊन आपली मते मांडा, असे आवाहन पाटील यांनी केले.

आज अकोला प्रवासादरम्यान पाटील यांनी जयहिंद चौक, अकोला येथे भाजपाच्या संकल्प पत्रासाठी सामान्य जनतेकडून सूचना मागविण्याच्या अभियानाचा शुभारंभ केला. या वेळी नागरिक, दुकानदार बांधवांशी संपर्क साधला. नवभारताचे शिल्पकार ठरलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विकसित भारताचे स्वप्न साकारण्यासाठी आपली मते मांडा, असे देखील आवाहन या वेळी पाटील यांनी केले.

Get real time updates directly on you device, subscribe now.