भुदरगडमध्ये भाजपची मुसंडी! माजी पंचायत समिती सदस्य संग्रामसिंह देसाई यांचा चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश

13

कोल्हापूर : भुदरगड तालुक्यातील मडिलगे येथील माजी पंचायत समिती सदस्य संग्रामसिंह देसाई यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह शनिवारी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय जनता पार्टीत अधिकृत प्रवेश केला. पाटील यांनी त्यांचे तसेच त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे पक्षात मनःपूर्वक स्वागत करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

प्रवेश सोहळ्यानंतर बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, सर्वसामान्य नागरिकांच्या सर्वांगीण विकासासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सातत्याने कार्यरत आहेत. केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकरी सन्मान योजना, पंतप्रधान विकसित भारत अभियान, लखपती दीदी योजना, सुकन्या समृद्धी योजना, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना यांसारख्या अनेक लोककल्याणकारी योजना प्रभावीपणे राबविल्या जात आहेत. याच विकासाभिमुख धोरणांमुळे जनतेचा ठाम विश्वास भारतीय जनता पार्टीवर अधिक बळकट होत आहे.

यावेळी जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील, प्रदेश कार्यकारिणी सदस्य राहुल चिकोडे, अल्कोश कांदळकर, प्रवीणसिंह पाटील, भगवान शिंदे, संतोष पाटील, रणजीत घाडगे, वसंतराव प्रभावळे, अमोल पाटील, सुनील पाटील, संजय भोसले यांच्यासह मडिलगे गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.