मुंबईच्या जहांगीर आर्ट गॅलरीला तोडीस तोड कलादालन उभारण्याचा आणि डिप्लोमासाठी स्वतंत्र बोर्ड स्थापन करण्याचा शासनाचा मानस – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

11

कोल्हापूर : कोल्हापूरच्या कलाक्षेत्रात गेल्या ४० वर्षांहून अधिक काळ नवनवीन प्रयोग करत असंख्य कलाकार घडवणाऱ्या ज्येष्ठ चित्रकार जी. एस. माजगावकर यांच्या कलाकृतींच्या भव्य ‘कलादालनाचे’ उद्घाटन आज उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले.

यावेळी बोलताना पाटील म्हणाले, कला हे माणसाच्या अंतःस्फूर्तीने व्यक्तिमत्व घडवणारे क्षेत्र असल्याने, शासन या क्षेत्राला नेहमीच प्रोत्साहन देत आहे. याच धर्तीवर कलेसाठी ‘डी. एन. ओ.’ हे स्वतंत्र विद्यापीठ मिळाले असून विक्रोळीमध्ये त्याचे नवीन कॅम्पस सुरू होत आहे, तसेच मुंबईच्या जहांगीर आर्ट गॅलरीला तोडीस तोड कलादालन उभारण्याचा आणि डिप्लोमासाठी स्वतंत्र बोर्ड स्थापन करण्याचा शासनाचा मानस आहे, अशी भावना यावेळी त्यांनी व्यक्त केली.

या सोहळ्याला कलासंचालक डॉ. किशोर इंगळे, वारणा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, माजी महापौर मारुतराव कातवरे, ॲड. अमित बाडकर यांच्यासह कला क्षेत्रातील अनेक दिग्गज आणि मान्यवर उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.