सार्वजनिक ग्रंथालयांच्या सक्षमीकरणासाठी आम्ही कटिबद्ध – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

11

कोल्हापूर : भुदरगड तालुक्यातील गारगोटी येथे उच्च व तंत्र शिक्षण विभाग व ग्रंथालय संचालनालयाच्या वतीने आयोजित दोन दिवसीय ‘ग्रंथोत्सव २०२६’ चा समारोप सोहळा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आणि पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडला.

यावेळी संबोधित करताना चंद्रकांत पाटील म्हणाले, पुण्यातील पुस्तक महोत्सवाला मिळालेल्या अभूतपूर्व प्रतिसादानंतर राज्य शासनाने प्रत्येक जिल्ह्यात अशा ग्रंथोत्सवांचे आयोजन करण्याचा निर्णय घेतला आहे. कोल्हापूरची ही वाचन परंपरा म्हणजे राजर्षी शाहू महाराज यांच्या विचारांचा जपलेला वारसा आहे. गेली दीडशे वर्षे वाचन संस्कृती जपणाऱ्या या भूमीत पुस्तकांशिवाय प्रगल्भता येत नाही, ही जाणीव अधिक दृढ होताना दिसते.

पाटील पुढे म्हणाले, सार्वजनिक ग्रंथालयांच्या सक्षमीकरणासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. ग्रंथालयीन कर्मचाऱ्यांच्या ६० टक्के अनुदानवाढीनंतर उर्वरित ४० टक्के वाढीसंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस सकारात्मक आहेत. तसेच १९६७ च्या कायद्यानुसार ग्रंथालयांच्या ‘अ’, ‘ब’, ‘क’, ‘ड’ वर्गवारीचे अपग्रेडेशन करण्यासाठी शासन ठोस पावले उचलत आहे. अद्ययावत सोयी-सुविधांनी सुसज्ज जिल्हा ग्रंथालय उभारून वाचन चळवळ अधिक व्यापक आणि प्रभावी करण्याचा आमचा निर्धार असल्याचे देखील पाटील यांनी स्पष्ट केले.

यावेळी ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर, माजी आमदार बजरंग देसाई, शामराव देसाई, नाथाजी पाटील तसेच सर्व अधिकारी, प्रकाशक आणि वाचनप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.