पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचा इस्रायलच्या सर्वोच्च पुरस्काराने सन्मान!… हा भारतासाठी अभिमानाचा क्षण – मंत्री चंद्रकांत पाटील
जेरुसलेम : भारत आणि इस्रायलमधील धोरणात्मक संबंधांना एका नव्या उंचीवर नेल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना इस्रायलच्या संसदेचा (नेसेट) सर्वोच्च सन्मान ‘स्पीकर ऑफ द नेसेट मेडल’ (Speaker of the Knesset Medal) देऊन गौरविण्यात आले आहे . २५ फेब्रुवारी २०२६ रोजी नेसेटला संबोधित केल्यानंतर संसदेचे सभापती अमीर ओहाना यांनी हा पुरस्कार प्रदान केला. पंतप्रधान मोदी हे हा सन्मान प्राप्त करणारे पहिले भारतीय पंतप्रधान आणि पहिले जागतिक नेते ठरले आहेत. हा भारतासाठी अभिमानाचा क्षण असल्याची प्रतिक्रिया उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली.
भारत आणि इस्रायलमधील धोरणात्मक संबंध अधिक दृढ करण्यासाठी आणि वैयक्तिक नेतृत्वाद्वारे दिलेल्या अतुलनीय योगदानासाठी हा सन्मान बहाल करण्यात येतो. पंतप्रधान मोदीजींना मिळालेला हा सन्मान दोन्ही राष्ट्रांमधील धोरणात्मक संबंध अधिक दृढ करण्यात त्यांच्या वैयक्तिक नेतृत्वाचे प्रतिबिंब आहे.
पंतप्रधान मोदीजी यांना यापूर्वी २०१८ मध्ये पॅलेस्टाईनचा सर्वोच्च सन्मान ‘ग्रँड कॉलर ऑफ द स्टेट ऑफ पॅलेस्टाईन’ ने देखील गौरवण्यात आले आहे. पॅलेस्टाईन आणि इस्रायल या दोन्ही राष्ट्रांचे सर्वोच्च सन्मान मिळवणारे पंतप्रधान मोदीजी हे मोजक्या जागतिक नेत्यांपैकी एक आहेत.
नेसेटमध्ये बोलताना मोदींनी दहशतवादाविरुद्ध भारताची भूमिका ठामपणे मांडली आणि भारत-इस्रायलमधील तंत्रज्ञान, संरक्षण व कृषी क्षेत्रातील सहकार्यावर भर दिला. इस्रायलच्या खासदारांनी त्यांचे उभे राहून स्वागत केले.
मंत्री चंद्रकांत पाटील यांनी या जागतिक गौरवाबद्दल पंतप्रधानांचे अभिनंदन केले आहे. हा सन्मान म्हणजे दोन्ही राष्ट्रांमधील दृढ मैत्रीचे प्रतीक असून १४० कोटी भारतीयांसाठी ही अभिमानाची बाब असल्याचे त्यांनी नमूद केले [