‘शिवगर्जना’च्या वतीने भारतीय सैन्याच्या अत्याधुनिक शस्त्रांचे प्रदर्शन, मंत्री चंद्रकांत पाटील यांची उपस्थिती

9

पुणे : शिवजयंतीचे औचित्य साधून पुण्यात शिवगर्जना प्रतिष्ठानच्या वतीने भारतीय सैन्य दलातील अत्याधुनिक शस्त्रास्त्रांचे भव्य प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. या आगळ्यावेगळ्या आणि प्रेरणादायी उपक्रमाला उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी भेट देऊन सैन्याच्या सामर्थ्याचे दर्शन घेतले.

देशाच्या सीमांचे रक्षण करणाऱ्या भारतीय सैन्याची ताकद, आधुनिक रणगाडे, क्षेपणास्त्रे आणि इतर शस्त्रे या प्रदर्शनात नागरिकांसाठी खुली करण्यात आली होती. आपल्या सैन्याची ताकद आणि संरक्षण सिद्धता जनतेसमोर मांडण्यासाठी शिवजयंतीसारखा पवित्र दिवस दुसरा असूच शकत नाही, असे प्रतिपादन मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. या प्रदर्शनामुळे तरुण पिढीमध्ये देशभक्तीची भावना अधिक दृढ होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

प्रतिष्ठानचे अमित तोरडमल आणि त्यांच्या संपूर्ण टीमने राबवलेल्या या स्तुत्य उपक्रमाचे मंत्र्यांनी विशेष कौतुक केले.

Get real time updates directly on you device, subscribe now.