सुप्रसिद्ध नृत्यांगना सुरेखा पुणेकर यांचा  शिवसंग्राम मध्ये प्रवेश

13

आपल्या लावणीने संपूर्ण महाराष्ट्राला भुरळ पडणाऱ्या जेष्ठ नृत्यांगना व कलाकार सुरेखा पुणेकर यांनी आमदार विनायक मेटे यांच्या मुंबई येथील कार्यालयात शिवसंग्राम पक्षामध्ये प्रवेश केला.

यावेळी शिवसंग्रामचे किनवट विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार भीमराव केराम, सोबत वरिष्ठ पदाधिकारी मा दिलीप माने साहेब, अविनाश खापे पाटील प्रदेश अध्यक्ष विद्यार्थी आघाडी महाराष्ट्र, उमेश पाटील जिल्हा अध्यक्ष नांदेड, गणेश पघळ जिल्हा अध्यक्ष जालना हे उपस्थित होते.

शिवसंग्रामचे राष्ट्रीय अध्यक्ष आमदार विनायक मेटे यांनी त्यांचे शिवसंग्राममध्ये स्वागत केले आणि पुढील राजकीय व सामाजिक कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.