सिद्धार्थ शिरोळे यांचं ‘मॉर्निंग टॉल्क’

आज सकाळी मॉडेल कॉलनी येथील चित्तरंजन वाटीकेला शिवाजीनगर विधानसभा मतदार संघाचे भाजपा महायुतीचे उमेदवार सिद्धार्थ शिरोळे यांनी भेट दिली. वाटीकेत नियमित मॉर्निग वॉल्क व व्यायामाला येणाऱ्या स्थानिक नागरिकांशी भेट घेऊन त्यांच्या अपेक्षा समजून घेतल्या.
मॉडेल कॉलनी परिसर सुधारणा कमिटीचे अध्यक्ष डॉ.हेगडे, कमिटी सदस्य उमा शर्मा, ज्योति देशपांडे, शामला देसाई, रूपा राजेशिर्के व शिवाजी भैरत यांच्या सोबत सविस्तर चर्चा केली.यावेळी त्यांच्या समवेत नगरसेविका नीलिमा खाडे, नगरसेविका स्वाती लोखंडे, नंदू मंडोरा, जीतू मंडोरा, संदीप काळे, रवींद्र साळेगावकर, दत्ता खांदागळे, अशोक लोखंडे, प्रवीण शेळके आणि पक्ष कार्यकर्ते उपस्थित होते.
प्रचार करण्यासाठी तरुण, जेष्ठ नागरिक, मतदारांना सकाळच्या प्रसन्न वातावरणात भेटून, प्रसन्न करण्यासाठीचा हा सिद्धार्थ शिरोळे यांचा ‘मॉर्निंग टॉल्क’ किती वर्कआउट होतोय ते येणाऱ्या २४ तारखेला कळेल.
#Shivajinagar #Shidharthshirole #BJP
