चिनी उत्पादनांची विक्री टाळा, सुनील माने यांचे व्यापारी महासंघास निवेदन
पुणे : एकीकडे चीन सीमारेषेवरील आपल्या कुरापती थांबविण्यास तयार नाही हे दिसत असताना, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आत्म निर्भर भारत संकल्पनेस बळ देण्यासाठी आपण व्यापारी महासंघातील इतर सदस्य व्यापारी यांनी चीनी उत्पादनांवर बहिष्कार टाकावा आणि देशातील उत्पादनांना प्राधान्य द्यावे, ज्यामुळे देशातील पैसा, देशातच राहून पायाभूत सुविधांसाठी त्याचा उपयोग होईल असे निवेदन आज पुणे शहर भाजपा चिटणीस सुनील माने यांच्या वतीने व्यापारी महासंघाचे अध्यक्ष फत्तेचंद रांका यांनां देण्यात आले, यावेळी त्यांच्या समवेत भाजपा व्यापारी आघाडीचे पुणे शहर अध्यक्ष महेंद्र व्यास उपस्थित होते.
फत्तेचंद रांका यांच्याशी इतर विविध विषयावर चर्चा झाली. भारतीय बाजार पेठ काबीज करण्याच्या चीनचा कुटील डाव उधळून टाकण्यासाठी व्यापारी महासंघ सहकार्य करेल अशी खात्री मला आहे, असे सुनील माने यांनी सांगितले.