माणुसकीला काळिमा .! शुल्लक कारणावरून लहान बहिणीची निघृणपणे हत्या

अकोला :- अकोल्यात एक मन सुन्न करणारी घटना घडली आहे. भावाने शुल्लक कारणावरून आपल्या आत्ते बहिणीची निघृणपणे हत्या केली आहे.

भाऊ आपल्या लहान बहिणीची निघृणपणे हत्या कशी करु शकतो ?  भाऊच पक्का वैरी निघाला असा प्रश्न अनेकांकडून उपस्थित केला जातोय. या घटनेवर अकोल्यातील विविध भागांमध्ये चर्चा सुरु झाली आहे. अशा नराधम भावाला कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी काही नागरीक आता करु लागले आहेत. बहिण-भावाच्या नात्यला काळीमा फासणारी ही घटना आहे.  नेहा नंदनलाल यादव असं मृतक तरुणीचं नाव आहे तीच वय १९ वर्ष तर २४ वर्षीय ऋषिकेश उर्फ बॉबी राममोहन यादव असं या मारेकरी भावाच नाव आहे. बॉबी आणि नेहा या दोघांमध्ये आज सायंकाळच्या सुमारास मोबाईलच्या हेडफोनवरुन वाद झाला. या दरम्यान, बॉबीनं नेहाच्या गळ्यावर चाकूने वार करून तिला गंभीर जखमी केले.

मुलीची आरडाओरड पाहता शेजाऱ्यांनी लागलीचं घटनास्थळ गाठले. जखमी नेहाला उपचारार्थ रुग्णालयात रवाना केले. मात्र तोपर्यंत तिचा मृत्यू झाला. आरोपी बॉबी यादव हा मृतक नेहाचा आतेभाऊ असून सध्या त्याला खदान पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तरीही हत्येच मूळ कारण अद्यापही कळू शकले नसून पुढील तपास पोलीस करत आहे.