काळाने घातला घात, विठू माऊलीच्या दर्शनासाठी निघालेल्या भक्तांचा भीषण अपघात; एकाच कुटुंबातील चौघे ठार

बुलढाणा: बुलढाणा जिल्ह्यात चिखली-खामगाव मार्गावर वैरागड गावाजवळ 3 वाहनांचा विचित्र अपघात झाला आहे. या अपघातात 4 जण जागीच ठार झाले तर 7 जण गंभीर जखमी झाले आहेत. उपचारासाठी जखमींना खामगाव सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मोहाडी घाटात बोलेरो- बोलेरो पिकअप व आणि टाटा सुमो या तीन वाहनांचा अपघात झाला आहे अशी माहिती आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अकोल्यातील भाविक पंढरपूरकडे जात असताना मोहाडीजवळ वाहनाने धडक दिली. अपघातातील मृतांची नावे श्यामसुंदर रोकडे (५५)- चालक, विश्वनाथ कराड (७२), शंकुतला कराड (६८), बाळकृष्ण खर्चे (७०), अपघातातील जखमींची नावे मुरलीधर रोहणकार, सुलोचना रोहणकार, उषा ठाकरे, श्यामराव ठाकरे, अलका खर्चे ही आहेत.
आज सकाळी 10 वाजताच्या सुमारास हा अपघात झाला आहे. हा अपघात इतका भीषण होता की, या अपघातात टाटा सुमो गाडीचा चुराडा झाला आहे. दोन मालवाहू बोलेरो सोयाबीनचे पोते घेऊन खामगावकडे जात असताना खामगावकडून चिखलीकडे जाणाऱ्या महावीतरण कंपनीच्या सुमो गाडीला धडकून हा विचित्र अपघात झालं आहे.
शेतातील सोयाबीन बाजारात विक्री साठी घेऊन जात असलेल्या दोन बोलेरो जीप घेऊन जात होते, बोलेरोला समोरून येणाऱ्या टाटा सुमो जीपला धडक बसली त्याच बोलेरो च्या मागे दुसरी बोलेरो जीप येऊन धडकली. असा विचित्र अपघात खामगाव जालना मार्गावरील मोहाडी गावानजीक घडला.
Read Also :
-
राज्य सरकाचा मोठा निर्यण: लोकल प्रवासाची नागरिकांना मुभा, ‘या’ नियमांचे करावे…
-
महाराष्ट्र सरकार माझ्या पतीच्या विरोधात काम करत आहे; क्रांती रेडकरचा मोठा खुलासा
-
जनाब संजय राऊत, तुम्हाला मलिकांच्या नजरेतूनच हिंदूस्थान पाहायचाय; चित्रा वाघ यांचा…
-
2500 नागरिकांचे लसीकरण, आरोग्य कर्मचाऱ्यांचा सत्कार, लहू बालवडकर यांच्या महा…
-
आर्यन प्रकरणी 25 कोटींची तोडबाजी तर 3500 किलो हेरॉईन प्रकरणात कितीची तोडबाजी?