अकोल्यात टँकरमध्ये उकळत्या डांबराचा स्फोट होऊन भीषण आग, दोन जण ठार

1

अकोला: अकोला नॅशनल हायवेवर काम करणाऱ्या ईगल कंस्ट्रक्शन कंपनीच्या टँकरला भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या आगीत दोन जण ठार झाले तर तिघांची प्रकृती गंभीर आहे. ही आग उकळत्या डांबराचा स्फोट होऊन लागली आहे. टँकरमध्ये केमिकल आणि डांबर होतं. मोठा आवाज होऊन स्फोट झाला आणि आग लागली.

या घटनेत दोघांचा मृत्यू घटना स्थळीच झाला. तसंच आग लागल्याने टँकर जळून खाक झाला. आगीची माहिती मिळताच अग्नीशमन दलाचे तीन बंब घटनास्थळी पोहचले. काही तास अथक प्रयत्न केल्यानंतर त्यांनी ही आग आटोक्यात आणली. या घटनेची माहिती मिळताच महसूल विभागाचे कर्मचारी आणि पोलीसही घटना स्थळी पोहचले.

या घटनेत ज्या दोघांचा मृत्यू झाला त्यांचे मृतदेह आगीत जळून खाक झाले आहेत. जे तीन जण जखमी झाले आहेत त्यांच्यावर अकोला मेडिकल कॉलेजमध्ये उपचार करण्यात येत आहेत. ही आग कशी लागली, स्फोट नेमका कसा झाला याचा तपास आता अग्नीशमन दल आणि पोलिसांकडून केला जातो आहे.

 

 

Get real time updates directly on you device, subscribe now.