कोरोना अपडेट : बुलडाणा, ९ कोरोना अहवाल निगेटिव्ह

11 525

बुलडाणा, दि. १९ : जिल्ह्यात आज प्राप्त ९ कोरोना अहवाल निगेटिव्ह आहेत. जिल्ह्यात एकूण 21 रूग्ण कोरोना पॉझीटीव्ह आढळले होते. त्यापैकी एक मृत आहे. त्यापैकी तीन रुग्णांचे फेर तपासणी नमुने कोरोनासाठी निगेटीव्ह आले असून त्यांना यापूर्वी वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे रूग्णालयातून डिस्जार्ज देण्यात आला आहे, तर उर्वरित १७ रूग्णांवर सध्या रूग्णालयात उपचार सुरू आहेत.


तसेच आज १९ एप्रिल रोजी ९ अहवाल प्राप्त झाले आहेत. हे सर्व ९ अहवाल निगेटीव्ह आहेत. तसेच आज रोजी अहवालाच्या प्रतिक्षेत असलेले नमुने ११ आहेत आणि कोविड रूग्णालयात उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रूग्ण १७ आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल २९७ आहेत, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. आर. जी पुरी यांनी दिली आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.