लग्नाच्या आमिष दाखवून भडाऱ्यांतील तरुणीचा नागपूरात मुंबईतील तरुणाकडून बलात्कार

नागपूर: लग्नाचा आमिष दाखवून फेसबुक फ्रेंडवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना नागपुरात उघडकीस आली आहे. पीडिता ही भंडारा जिल्ह्याची आहे, तर आरोपी मुंबईचा रहिवासी आहे. नागपूरच्या हॉटेलमध्ये होणाऱ्या भेटीगाठींवेळी आरोपीने अत्याचार केल्याचा आरोप आहे. गणेशपेठ पोलिसानी गुन्हा दाखल केला असून आरोपीचा शोध सुरु आहे.

लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर बलात्कार केल्याची घटना गणेशपेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीत समोर आली आहे. आरोपीची पीडितेसोबत फेसबुकवर मैत्री झाली होती. पीडित महिला ही भंडारा येथे राहत होती, तर आरोपी समाधान पवार हा मुंबईला राहतो. त्यामुळे ते नागपुरात भेटत होते.

नागपूरच्या सीए रोड येथील एका हॉटेलमध्ये आरोपी पीडितेला घेऊन जायचा. मी तुझ्यासोबत लग्न करतो, असं सांगून तो पीडितेसोबत दुष्कर्म करत होता, मात्र लग्न करण्यासाठी टाळाटाळ करत होता. यामुळे पीडितेने भंडारा आणि नागपूरच्या पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली असून गणेशपेठ पोलीस तपास करत आहेत.

सोशल मीडियावर झालेली ओळख आणि फेसबुक फ्रेण्डवर ठेवलेला विश्वास कितपत योग्य आहे, हे तपासणं गरजेचं आहे, अन्यथा असा घात होण्यास वेळ लागत नाही.