नागपुरात प्लास्टिक कंपनीला भीषण आग; तीन गोदाम जळून खाक

नागपूर: शहरातील उपलवाडी परिसरात आज सकाळी मोठी आग लागलीय. कामठी रोड परिसरात प्लास्टिक गोदामाला ही आग लागली. अग्निशमन विभागाकडून आग विझविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या आगीत तीन गोदाम जळून खाक झाल्याची माहिती आहे.

मिळालेल्या माहितीनुसार सोमवारी सकाळी साडेसहा वाजल्याच्या दरम्यान ही आग लागल्याचं कळतंय. या वेळेत कंपनी आणि गोडाऊनमध्ये कोणताही मजूर नसल्यामुळे जिवीतहानी टळली आहे. परंतू या आगीत टायर आणि प्लास्टिकचं सामान पूर्णपणे जळून खाक झालं आहे. अग्नीशमन दलाचे अधिकारी या आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतू प्लास्टिकच्या सामानामुळे ही आग आणखीन धुमसते आहे. या आगीचं कारण अद्याप समजू शकलेलं नाहीये.

प्लास्टीकच गोदाम असल्यानं आग पसरत चाललीय. त्यामुळं आग विझविण्याचे मोठे आव्हान अग्निशमन विभागापुढं आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन विभागाची चमू घटनास्थळी दाखल झाली. त्यांनी आग विझविण्याचे प्रयत्न सुरू केली आहेत.