‘मन्नतवर दिवाळी’, आर्यन खान 27 दिवसानंतर तुरुंगाबाहेर

मुंबई: मुंबई ड्रग्ज प्रकरणी शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान तब्बल  27 दिवसांनंतर तुरुंगातून बाहेर आला आहे. न्यायालयातून जामीन मिळूनही कारागृह प्रशासनापर्यंत कागदपत्रे वेळेत न पोहोचल्याने आर्यन खानला आणखी एक रात्र मुंबईच्या आर्थर रोड तुरुंगात काढावी लागली. मात्र, शनिवारी तो तुरुंगातून बाहेर आला.

आर्यन खानला क्रुझ ड्रग्ज प्रकरणी गुरुवारी कोर्टाने जामीन मंजूर केला होता. पण काल सुटकेची प्रक्रिया पूर्ण न झाल्याने कालची रात्र त्याला तुरुंगात काढावी लागणार लागली. आज अगदी सकाळीच आर्यनच्या सुटकेची प्रकिया सुरु झाली.  सकाळी 6 ते 11 वाजेपर्यंत ही सगळी प्रक्रिया पूर्ण झाली. अखेर 11 वाजताच्या सुमारास आर्यन खान ऑर्थर रोड तुरुंगाच्या बाहेर पडला. आर्यनच्या स्वागतासाठी मन्नत बंगल्यावरही मोठ्या प्रमाणात स्वागताची तयारी करण्यात आली आहे.

आर्यन खानला अटक होताच नवाब मलिकांकडून पत्रकार परिषद घेऊन कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं, कारवाई बनावट असल्याचा दावा, मनीष गोसावीवर प्रश्नचिन्ह, त्यानंतर एनसीबीनं पत्रकार परिषद घेत गोसावी आणि भानुशाली साक्षीदार असल्याचं सांगितलं.

त्यानंतर महाविकास आघाडीतील पक्षांसह भाजपनेही या प्रकऱणात उडी मारली होती. यावरून आर्यन खान प्रकरणाला नाट्यमय वळण लागले होते. आज आर्यन खानला २७ दिवसांनंतर जामीन मंजून झाला असून तो बाहेर आला आहे. त्यामुळे आर्यन खान प्रकरणाला लागलेल्या राजकीय रंगातील आरोप प्रत्यारोपाच्या फैरी खंडावणार का?, हे पहाणे महत्वाचे ठरणार आहे.

Read Also :