आर्यन खानच्या अडचणीत वाढ; एनसीबीकडून बँकेचे व्यवहार शोधायला सुरुवात

3

मुंबई: अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानशी संबंधित मुंबई क्रूझ ड्रग्ज आता नवीन माहितीसमोर येत आहे. अंमली पदार्थ विरोधी पथकानं आता आर्यन खानच्या बँक खात्यातील व्यवहारांची पडताळणी करण्यास सुरुवात केली आहे. ड्रग्ज खरेदी करण्यासाठी आर्यन खान यानं त्याच्या बँक खात्यातून कोणता व्यवहार केला आहे का याची तपासणी एनसीबीच्या अधिकाऱ्यांकडून केली जात आहे. जर तसं केलं असेल तर आर्यन खाननं नेमकं कोणत्या खात्यात आणि किती पैसे वळते केले होते? कोणत्या व्यक्तीला आणि कशासाठी पैसे दिले गेले याची सविस्तर चौकशी एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी सुरू केली आहे.

त्याच्या व्हॉट्सअप संवादात अभिनेत्री अनन्या पांडे हीच नाव उघडकीस आलं आहे. अनन्या पांडे आणि आर्यन खान यांच्यात ड्रग्ज बाबत चर्चा झाली होती. दोघांमध्ये ड्रग्ज मागवण्याबाबत चर्चा झाली होती. याचमुळे एनसीबी अधिकाऱ्यांनी अनन्या पांडे हिला दोन वेळा चौकशीसाठी बोलावलं होतं. तिची सुमारे सात तास चौकशी झाली आहे. यावेळी या संभाषणाबाबत चौकशी झाली. याच संभाषणामुळे आर्यन याला जामीन मिळण्यास अडचण निर्माण झाली आहे. त्यामुळे एनसीबी अधिकारी आता आर्यन खान, अनन्या पांडे यांच्या ड्रग्ज अँगलने तपास करत आहे.

तसेच शाहरुख खानची मॅनेजर पूजा ददलानी आज सकाळी एनसीबीनं मागणी केलेल्या कागदपत्रांचा लिफाफा घेऊन एनसीबीच्या मुंबईतील कार्यालयात पोहोचली होती. एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी शाहरुख खानकडून आर्यन खानच्या ड्रग्ज प्रकरणी काही कागदपत्रांची मागणी केली होती. त्याच संदर्भातील कागदपत्रं आज एनसीबीकडे सुपूर्द करण्यात आली आहेत. आर्यन खानच्या जामीन अर्जावर मंगळवारी सुनावणी होणार आहे. तोपर्यंत आर्यन विरोधात सबळ पुरावे जमा करण्याचं काम एनसीबीकडून केलं जात आहे. आर्यन खानला जामीन नाकारण्यासाठीची जोरदार तयारी एनसीबीकडून करण्यात येत आहे.

Read Also :

Get real time updates directly on you device, subscribe now.