समीर वानखेडेंना मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा, अटकेपूर्वी 3 दिवस आधी नोटीस देण्याचे सरकारला आदेश

मुंबई: क्रुझ ड्रग्ज पार्टी प्रकरणानंतर एनसीबीविरोधात करण्यात आलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या समीर वानखेडे यांना उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला. न्यायमूर्ती नितीन जामदार आणि न्यायमूर्ती सारंग कोतवाल यांच्या खंडपीठाने तूर्तास कोणतीही कठोर कारवाई न करण्याचे राज्य सरकारला निर्देश दिले. तसेच जर चौकशीत अटकेची गरज भासल्यास किमान तीन दिवस (७२ तास) आधी नोटीस द्या, असेही न्यायालयाने स्पष्ट करून याचिका निकाली काढली.

प्रभाकर साईल, ऍड. सुधा द्विवेदी, ऍड. कनिष्का जैन आणि नितीन देशमुख यांनी समीर वानखेडे यांच्या विरोधात वेगवेगळ्या तक्रारी आहेत. वानखेडे यांच्या विरोधातील तक्रारीची चौकशी करण्यासाठी राज्याकडून SITची स्थापन करण्यात आली आहे. या पथकात सहाय्यक पोलीस आयुक्त मिलिंद खेतले, पोलीस निरीक्षक अजय सावंत, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकांत कारकर आणि पोलीस उप निरीक्षक प्रकाश गवळी या अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली होती.

एनसीबीचा पंच प्रभाकर साईल याने केलेल्या आरोपांनुसार एनसीबीच्या पाच सदस्यीय पथकाने एनसीबी मुंबईचे अधिकारी समीर वानखेडे  यांच्याकडे चौकशी सुरू केली आहे. वानखेडे यांचा जबाब नोंदविण्यात येत असल्याचे एनसीबीचे उपसंचालक ज्ञानेश्वर सिंग यांनी सांगितले.

आर्यन याला सोडण्यासाठी बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान यांच्या मुंलाल सोडण्यासाठी त्यांच्याकडे 25 कोटींची मागणी करण्यात आल्याचा आरोपासह पंच प्रभाकर साईल याने समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्यानुसार एनसीबी महासंचालकांनी नेमलेले पाच सदस्यांची समिती पथक मुंबईत दाखल झाले आहे. एनसीबीचे उपसंचालक ज्ञानेश्वर सिंग यांच्या नेतृत्वाखाली हे पथक या आरोपांची चौकशी करत आहे.

Read Also :