आर्यन खानची दिवाळी ‘मन्नत’वर; हायकोर्टाकडून जामीन मंजूर

मुंबई: क्रूझ ड्रग्स केस प्रकरणात बॉलिवूडचा किंगखान अर्थात अभिनेता शाहरुख खान याचा सुपुत्र आर्यन खानला अखेर 25 दिवसांनी दिलासा मिळाला. मुंबई हायकोर्टानं  गुरुवारी आर्यन खानचा जामीन मंजूर केला. आर्यनसोबत या प्रकारणातील सहआरोपी मुनमुन धमेचा आणि अरबाझ मर्चेंट या दोघांचा देखील जामीन मंजूर करण्यात आला आहे. मात्र, तिघांना आज ऑर्थर रोड जेलमध्येच राहावं लागणार आहे.

मुंबई हायकोर्टात गेल्या तीन दिवसांपासून आर्यन खानच्या जामीन अर्जावर सुनावणी सुरू होती. माजी अटॉर्नी जनरल मुकुल रोहतगी यांनी आर्यन खानच्या बाजुने युक्तीवाद केला. अखेर गुरुवारी हायकोर्टाने आर्यन खानचा जामीन मंजूर केला. त्यामुळे आर्यन खान यंदाची दिवाळी ‘मन्नत’वर साजरी करणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. आर्यन खानसह मुनमुन धमेचा आणि अरबाझ मर्चेंटच्या सुटकेबाबत शुक्रवारी कोर्ट आदेश देईल त्यानंतर तिघे शुक्रवार किंवा शनिवारी तुरुंगातून बाहेर येतील, अशी माहिती वकील मुकुल रोहतगी यांनी दिली आहे.

मुंबई हायकोर्टानं आर्यन खानचा जामीन मंजूर केल्यानंतर मुकुल रोहतगी म्हणाले, ‘हायकोर्टासमोर विविध मुद्द्यांना अनुसरून युक्तिवाद करण्यात आला. त्यानंतर कोर्टान बचाव पक्षांच्या बाजूही ऐकल्यानंतर आपला निर्णय दिला. हायकोर्टाने आर्यन खान, मुनमुन धमेचा आणि अरबाझ मर्चेंटचा जामीन मंजूर केला आहे.

उद्या, शुक्रवारी याबाबात सविस्तर आदेश मिळेल. तिघे उद्या किंवा शनिवारी तुरुंगाबाहेर येतील, अशी अपेक्षा असल्याचं रोहतगी यांनी सांगितलं. दरम्यान, आरोपींकडे असणारे ड्रग्ज आणि कटकारस्थान या मुद्द्यांवर NCB ला युक्तिवाद करता आला नाही. ज्या धर्तीवर आर्यनचा जामीन मंजूर करण्यात आल्याचं रोहतगी यांनी माहिती दिली.

Read Also :

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

error: Content is protected !!