आर्यन खानला दिलासा नाहीच, आता सुनावणी ‘या’ दिवशी पूर्ण होणार?

5

मुंबई: मुंबईच्या एनडीपीएस कोर्टाने आर्यन खानचा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर आता त्याच्या वकिलांनी हाय कोर्टात धाव घेतली होती. आर्यन खानचे वकील सतीश मानेशिंदे आणि अमित देसाई यांनी जामिनासाठी हायकोर्टात अर्ज दाखल केला आहे. मात्र, न्यायमूर्ती नितीन सांब्रे यांच्या खंडपीठासमोर झालेल्या सुनावणीत आर्यन खान आणि इतरांच्या जामीन अर्जावर पुढील मंगळवारी सुनावणी करण्यात येईल, असा निर्णय देण्यात आला आहे. आर्यन खानचा तुरुंगातील मुक्काम मंगळवार पर्यंत वाढला आहे.

मुंबईच्या सत्र न्यायालयाने आर्यन खानचा जामीन अर्ज फेटाळून लावल्याने आर्यन खानच्या अडचणीत वाढ झाल्या आहेत. आधी किल्ला कोर्टाने जामीन फेटाळला त्यानंतर काल सत्र न्यायालयाने जामीन फेटाळला. त्यानंतर आर्यन खानने त्वरित उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.  हायकोर्टात आज त्याच्या जामीन अर्जावर सुनावणी होणार  होती. मात्र आता ही सुनावणी मंगळवारी होणार आहे.. दरम्यान आर्यनची न्यायालयीन कोठडी संपत असल्यानं न्यायालयीन कोठडी वाढवण्यासाठी एन सी बी किल्ला कोर्टात मागणी करणार आहे.

कोरोना निर्बंध शिथिल करून, आजपासून म्हणजेच 21 ऑक्टोबरपासून, कैदी विचाराधीन कैद्यांना त्यांच्या नातेवाईकांना भेटण्याची परवानगी देण्यात आली आहे. या बदलानंतर, आजपासून जास्तीत जास्त दोन नातेवाईक किंवा वकील कैद्यांना भेटू शकतील. अशा परिस्थितीत, शाहरुख खान, जो आपल्या मुलाला गेल्या काही दिवसांपासून भेटू शकला नाही, तो सकाळीच मुलाला भेटण्यासाठी तुरुंगात पोहोचला .

Read Also :

Get real time updates directly on you device, subscribe now.