आर्यन खान याला आजही जामीन नाहीच; उद्या पुन्हा होणार सुनावणी

मुंबई: कार्डिला ड्रग्ज प्रकरणी अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याच्या जामिनावर आजही सुनावणी पूर्ण न झाल्याने निर्णय झाला नाही. त्यामुळे आर्यनला आजही तुरुंगातच राहावे लागणार आहे. उच्च न्यायालयात त्याच्या जामिनावर सुनावणी सुरू आहे. काल अपूर्ण राहिलेली सुनावणी आज घेण्यात आली. आर्यनच्या वकिलांनी कालच युक्तीवाद पूर्ण केला होता.

मात्र, आज अरबाज मर्चंटच्या वकिलांनी युक्तीवाद केला. एनसीबीने आरोपींना फौजदारी दंड संहितेच्या ४१ (अ) खाली आगाऊ नोटीसही द्यायला हवी होती जेणेकरून त्यांच्याकडून तपासात सहकार्य मिळाले असते. कमाल सात वर्षे शिक्षा असलेल्या प्रकरणांत आरोपीला अशी नोटीस देणे आवश्यक असल्याचे सुप्रीम कोर्टाने अनेक निवाड्यांत स्पष्ट केलेले आहे, असा युक्तीवाद अरबाझचे वकिल अमित देसाई यांनी केला. एनसीबीतर्फे उद्या अतिरिक्त महान्यायअभिकर्ता अनिल सिंह युक्तिवाद करणार आहेत. त्यानंतर उच्च न्यायालयाकडून पुढील आदेश दिला जाण्याची शक्यता आहे.

युक्तिवादात काय म्हटलं गेलं?

आर्यन, अरबाज आणि मूनमूनच्या वतीनं अमित देसाई आणि मुकुल रोहतगी यांनी न्यायालयात युक्तिवाद मांडला. ज्यामध्ये त्यांची बाजू विविध मुद्द्यांच्या अनुषंगानं स्पष्ट करण्यात आली. हा कटकारस्थानाचा भाग असून हा ट्रॅप आहे असं सांगत ड्रग्ज घेणाऱ्या लोकांना पकडण्यासाठी एनसीबी अधिकारी तिकडे गेले होते तर ब्लड टेस्ट का करण्यात आली नाही असा सवाल अरबाजच्या वकिलांकडून उपस्थित करण्यात आला.

Read Also :