रक्षा खडसेंचा जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत उमेदवारी अर्ज बाद

जळगाव: जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत रक्षा खडसे, विधानपरिषदेच्या माजी आमदार स्मिता वाघ यांचे उमेदवारी अर्ज बाद झाल्याने  भाजपला जबर धक्का बसला आहे. भाजपला जिल्हा बँक निवडणुकीत जबर आहे.  तर मुक्ताईनगर विकास सोसायटी मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे हे बिनविरोध निवडून येणार आहेत. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे पारडे जड मानले जात आहे.

धरणगाव विकास सोसायटी मतदारसंघानंतर अमळनेर विकास सोसायटी, बोदवड आणि मुक्ताईनगर विकास सोसायटी मतदारसंघात उमेदवार बिनविरोध निवडून येणार आहेत. अमळनेर विकास सोसायटी मतदारसंघातून भाजपच्या माजी आमदार स्मिता वाघ यांचा उमेदवारी अर्ज बाद झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अनिल भाईदास पाटील हे बिनविरोध निवडून येणार आहेत. तर मुक्ताईनगर विकास सोसायटी मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे हे बिनविरोध निवडून येणार आहेत.

मुक्ताईनगर विकास सोसायटी मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे एकनाथ खडसे आणि त्यांच्या कन्या रोहिणी खडसे यांचेच अर्ज उरले आहेत. या ठिकाणी रोहिणी खडसे अर्ज मागे घेण्याची चिन्हं आहेत. रोहिणी खडसे महिला राखीव मतदारसंघातून लढण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, भुसावळ विकास सोसायटी मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार संतोष चौधरी यांचाही अर्ज बाद झाला आहे. या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे रमण भोळेंना उमेदवारीची संधी मिळणार आहे. संतोष चौधरी यांना पक्षांतर्गत कुरघोडींचा फटका बसल्याचं दिसत आहे.

 

Read Also :

Get real time updates directly on you device, subscribe now.

error: Content is protected !!