नात्याला काळीमा! पुण्यात तरुणीला ज्यूसमधून गुंगीचं औषध देत मित्राकडून बलात्कार

पुणे: तरुणाने आपल्या मैत्रीणीला ज्यूसमधून गुंगीचं औषध देऊन बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. नराधम आरोपीनं पीडित तरुणीला गोड बोलून आपल्या फ्लॅटवर गेला होता. याठिकाणी आरोपीनं ज्यूसमधून पीडितेला गुंगीचं औषध दिलं होतं. यानंतर गुंगी आलेल्या युवतीवर आरोपीनं बलात्कार केला.

आरोपी एवढ्यावरच थांबला नाही, तर त्याने बलात्कार करतानाचा व्हिडीओ देखील केला आहे. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव अक्षय कदम असे आहे. पुण्यातील आंबेगाव परिसरातील रहिवासी आहे,  तर पीडित तरुणी ही आरोपी अक्षयच्या ओळखीची आहे. 31 जुलै रोजी आरोपी तरुण पीडित तरुणीला आपल्या फ्लॅटवर घेऊन गेला होता. याठिकाणी आरोपीने पीडितेला गुंगीचं औषध टाकलेला ज्यूस प्यायला दिलं होतं. ज्यूस प्यायल्यानंतर काही वेळातच पीडित तरुणीला गुंगी आली.

यानंतर आरोपीनं मैत्रीच्या नात्याला काळीमा फासत पीडित तरुणीवर बलात्कार केला आहे. नराधम आरोपी एवढ्यावरच थांबला नाही, तर त्याने बलात्कार करतानाचा व्हिडीओ देखील बनवला आहे. यानंतर आरोपीनं पीडित तरुणीला लग्नाचं आमिष दाखवत आणि संबंधित अश्लील व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत अनेकदा अत्याचार केला आहे. शेवटी पीडित तरुणीने आरोपीकडे लग्नाची मागणी केली. पण आरोपीनं लग्न करण्यास नकार दिला.

आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यानंतर, पीडित तरुणीने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात आरोपीविरोधात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी बलात्कारासह ब्लॅकमेलिंगच्या कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास भारती विद्यापीठ पोलीस करत आहेत.

Read Also :

Get real time updates directly on you device, subscribe now.

error: Content is protected !!