एमएचटी सीईटी परीक्षेचा निकाल आज सांयकाळी 7 वाजता होणार जाहीर

मुंबई: महाराष्ट्र राज्य सामान्य प्रवेश परीक्षा अर्थात महा सीईटी परीक्षेचा निकाल आज सांयकाळी 7 वाजता जाहीर होणार आहे. विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्ष 2021-22 करिता राज्य सीईटी कक्षाकडून घेण्यात आलेल्या MHT-CET-2021 ऑनलाईन प्रवेश परीक्षेचा निकाल आज सायंकाळी 7. 00 नंतर उमेदवारांच्या लॉगीनमधून https://mhtcet2021.mahacet.org या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यासंदर्भात राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी ट्विटव्दारे माहिती दिली आहे.

भौतिकशास्त्र रसायनशास्त्र, गणित म्हणजे पीसीएम आणि भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र अर्थात PCB या दोन्ही विषयांसाच्या ग्रुपचे निकाल प्रसिद्ध केले जातील. एमएचटी सीईटीचा निकाल cetcell.mahacet.org आणि mhtcet2021.mahacet.org या दोन अधिकृत संकेतस्थळांवर प्रसिद्ध केला जाईल. तुम्ही दोन्हीपैकी कोणत्याही वेबसाईटला भेट देऊन तुमचा निकाल पाहू शकता.

एमएचटी सीईटी निकालासोबत गुणवत्ता यादी देखील प्रसिद्ध केली जाईल. B.Tech आणि B.Arch अभ्यासक्रमांमध्ये प्रवेशासाठी अभ्यासक्रम आणि श्रेणीनिहाय स्वतंत्र गुणवत्ता यादी तयार केली जाईल. उमेदवारांना त्यांच्या गुणवत्ता यादीतील रँकच्या आधारे जागा वाटप केल्या जातील पण त्यासाठी आधी समुपदेशन केले जाईल.

Read Also :