तुम्ही करा रे कितीही हल्ला, लय मजबूत भिमाचा किल्ला; चित्रा वाघ यांचं नवाब मलिकांना प्रत्युत्तर

12

मुंबई: आर्यन खान प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक  यांनी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप केलाय. बॉलिवूडमधील लोकांकडून खंडणी वसुली, लाचखोरी आणि बनावट कागदपत्रांद्वारे नोकरी मिळवल्याचा आरोपाचा त्यात समावेश आहे. नवाब मलिकांच्या या आरोपांना स्वत: समीर वानखेडे, त्यांच्या पत्नी अभिनेत्री क्रांती रेडकर आणि बहीण यास्मिन वानखेडे यांनी उत्तर दिलं आहे. त्यानंतर आता भाजपच्या उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनीही या आरोपांवरुन नवाब मलिकांना प्रत्युत्तर दिले आहे.

तुम्ही…त्याला धमक्या दिल्या, त्याला अपमानीत केलं, त्याच्या पत्नीला शिव्या दिल्या, त्याच्या बहिणीवर आरोप केले, त्याच्या आई-वडीलाना बदनाम केलं, त्याचा जात धर्म काढला… तरीही तो डगमगला नाही, कर्तव्य बजावत राहीला… तुम्ही करा रे कितीही हल्ला, लय मजबूत भिमाचा किल्ला” असं ट्वीट करुन चित्रा वाघ यांनी समीर वानखेडे यांच्यावरील आरोपींवर नवाब मलिकांना जोरदार प्रत्युत्तर दिलंय.

आमची लढाई फर्जी समीर वानखेडे यांच्यासोबत आहे. हा हिंदू मुस्लिम प्रश्न नाही. मी धर्माला घेऊन कधी राजकारण करत नाही, असे नवाब मलिक म्हणाले. त्याचवेळी ते म्हणाले, दलित मागासवर्गीय असल्याचे खोटे जात प्रमाणपत्र समीर वानखेडे यांनी बनवले. आणि एका मागासवर्गीयाचा हक्क हिरावला. मी समोर आणलेले सर्टिफिकेट खरं आहे. मी माझ्या शब्दावर ठाम आहे, असा दावा नवाब मलिक यांनी केला आहे.

Read Also :

Get real time updates directly on you device, subscribe now.