नोकरदारांसाठी आनंदाची बातमी; पीएफ खात्यावर 8.5 टक्के व्याजदर देण्याचा निर्णय
मुंबई: दिवाळ सणापूर्वी देशभरातील जवळपास सहा कोटी पीएफ सभासदांसाठी आनंदाची बातमी आहे. अर्थ मंत्रालयाने २०२०-२१ या वर्षाकरिता पीएफ रकमेवर ८.५ टक्के व्याज देण्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे. लवकरच सभासदांच्या खात्यात व्याजाची रक्कम जमा करण्यात येणार आहे. ईपीएफ मंडळाने व्याजदर ८.५ ठेवण्याची शिफारस केली होती. ती अर्थ मंत्रालयाने मंजूर केली.
कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीचे व्यवस्थापन करणाऱ्या ‘ईपीएफओ’ने दिवाळीपूर्वी सभासदांच्या खात्यात व्याजाची रक्कम जमा करण्यासाठी प्रयत्न केले होते. २०१९-२० या वर्षासाठी पीएफवर ८.५ टक्के व्याजदर मंजूर करण्यात आला होते. हाच व्याजदर २०२०-२१मध्ये कायम ठेवण्यात आला आहे.
मार्च महिन्यात ८.५ टक्के व्याजदरावर शिक्कामोर्तब करण्यात आले होते. तसा प्रस्ताव अर्थ खात्याकडून मंजुरीसाठी पाठवण्यात आला होता. त्यावर अर्थखात्याने शिक्कामोर्तब केलं आले. त्यामुळे पीएफ व्याजाची वाट पाहणाऱ्या कोट्यवधी सभासदांना दिलासा मिळाला आहे. या निर्णयाने पीएफ सभासदांसाठी दिवाळी आनंदाची जाईल, असे मत श्रम सचिव सुनील भरतवाल यांनी व्यक्त केले.
करोना संकट काळात सभासदांना आर्थिक मदत व्हावी या उद्देशाने केंद्र सरकारने पीएफ खात्यातून अंशतः पैसे काढण्यास परवानगी दिली होती. या काळात हजारो कोटी काढण्यात आले. त्यामुळे सरकारला सलग दुसऱ्या वर्षी व्याजदर स्थिर ठेवावा लागल्याचे बोलले जाते. आत अर्थ खात्याने ८.५ टक्के व्याजाला मंजुरी दिल्यानंतर लवकरच सभासदांच्या खात्यात व्याजाचे पैसे जमा करण्याची प्रक्रिया सुरु केली जाईल, असे भरतवाल यांनी सांगितले.
Read Also :