एनसीबी प्रकरणी क्रांती रेडकर यांचा काय संबंध – संजय राऊत

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप केल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. दरम्यान, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी एनसीबी, समीर वानखेडे आणि त्यांच्या क्रांती रेडकरवर आपली भूमिका स्पष्ट केली. क्रांती रेडकर यांचा एनसीबी प्रकरणात काय संबंध? असे संजय राऊत यांनी म्हंटल.
संजय राऊत म्हणाले की, क्रांती रेडकर यांचा एनसीबी प्रकरणात काय संबंध? ही लढाई एनसीबी आणि इतर अशी सुरु आहे. मला वाटत नाही क्रांती रेडकर यांच्यावर कोणी व्यक्तीगत टीका केली आहे, मी तरी पाहिले नाही. आम्हाला क्रांती रेडकर यांच्या विषयी प्रेम आहे, ती मराठी मुलगी आहे. कोणत्याही प्रकारचा तिच्यावर अन्याय होणार नाही असे संजय राऊत यांनी म्हंटल.
दरम्यान, मागील काही दिवसांपासून मुंबई ड्रग्ज प्रकरणी मंत्री नवाब मलिक हे ‘एनसीबी’चे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर आरोप करत होते. समीर वानखेडे हे मुस्लीम असल्याचा दावाही त्यांनी केला होता. मलिक यांनी वानखेडे यांच्या पहिल्या लग्नाचे काही फोटोही ट्विट केले होते. या प्रकरणी समीर वानखेडे यांच्या पत्नी, अभिनेत्री क्रांती रेडकर यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना पत्र लिहिले होते.
या पत्रात म्हटलं आहे की, आज बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांना हे सहन झालं नसतं. आज बाळासाहेबांची प्रतिमा आम्ही तुमच्यात बघतो. मी लहानपणापासून मराठी माणसाच्या न्याय्य हक्कासाठी लढणारी शिवसेना पाहत लहानाची मोठी झाली आहे. मी एक मराठी मुलगी असल्याचेही क्रांती रेडकरने म्हटलं होतं.
Read Also :