सुपरस्टार सुपरस्टार पुनित राजकुमार यांचं 46 व्या वर्षी निधन

मुंबई: कन्नड सुपरस्टार पुनित राजकुमार यांचं निधन झालं आहे. शुक्रवारी त्यांना हृदयविकाराचा झटका आल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. क्रिकेटपटू वेंकटेश प्रसाद आणि बॉलिवूड अभिनेता सोनू सोद यांनी पुनित राकुमार यांच्या निधनाच्या वृत्ताबद्दल दु:ख व्यक्त केलं आहे.

पुनित राजकुमार यांना छातीत दुखत असल्यामुळे बंगळुरुतील विक्रम रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.  हॉस्पिटलमध्ये दाखल करतानाच पुनीत राजकुमार यांना अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आलं होतं. डॉक्टरांची एक टीम त्यांच्यावर सतत देखरेख ठेवून होती. उपचारावेळी त्यांची प्राणज्योत मालवली.

पुनीत राजकुमार यांच्या निधनाची बातमी कळताच सर्वत्र शोककळा पसरली आहे. टॉलिवूडपासून बॉलिवूड आणि क्रिकेट जगतातूनही श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. पुनीत राजकुमार यांच्या निधनानं टॉलिवूडमध्ये मोठा धक्का बसला आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज एस. बोम्मई यांनी पुनीत राजकुमार यांची तब्येतीची विचारपूस करण्यासाठी विक्रम हॉस्पिटल गाठलं होतं.

अभिनेता पुनीत राजकुमार यांना सकाळी 11.30 वाजता छातीत दुखू लागल्यानं हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. डॉक्टारांनी त्यांच्यावर उपचार करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. मात्र, उपचारावेळी त्यांची प्राणज्योत मालवली. डॉक्टरांनी हृदयविकाराने त्यांचा मृत्यू झाल्याचं सांगितलं.

Read Also :