नाशिक हादरलं! वणी येथे महिलेला उचलून नेऊन सामूहिक बलात्कार

नाशिक: नाशिक जिल्हा सामूहिक बलात्काराने हादरला आहे. नाशिक जिल्ह्यातील सप्तश्रृंगी देवीच्या वणीमध्ये एका महिलेवर सामूहिक बलात्कार करण्यात आला आहे. जीवे मारण्याची धमकी देत आरोपींनी पीडित महिलेवर बस स्टॉपमध्येच बलात्कार केला. या प्रकरणी पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे. या घटनेमुळे नाशिक जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नाशिक जिल्ह्यातील वणी येथील बस स्थानकावर 42 वर्षीय पीडित महिला आणि तिचा मित्र बसले होते. यावेळी त्याठिकाणी आलेल्या चौघांनी पीडित महिला आणि तिच्या मित्राला जीवे मारण्याची धकमी दिली. त्यानंतर त्यांनी आळीपाळीने पीडित महिलेवर बलात्कार केला. बुधावारी रात्री अकराच्या सुमारास ही घटना घडली आहे. या प्रकरणी पीडित महिलेने वणी पोलिस ठाण्यात आरोपींविरोधात तक्रार दाखल केली.
महिलेने दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारावर पोलिसांनी चारही आरोपींविरोधात सामूहिक बलात्कार आणि अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी आरोपींचा शोध घेत चौघांनाही बेड्या ठोकल्या. चारही आरोपी पोलिसांच्या ताब्यात असून त्यांची चौकशी सुरु आहे. आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे. या घटनेमुळे नाशिक जिल्हा हादरला आहे.
Read Also :
-
समीर वानखेडेंना मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा, अटकेपूर्वी 3 दिवस आधी नोटीस…
-
मोठी बातमी! एमपीएससी कडून महाराष्ट्र दुय्यम सेवा परीक्षेची घोषणा, 666 पदांसाठी…
-
पेट्रोल, डिझेलची दरवाढआपल्या भल्यासाठीच; मुख्यमंत्र्यांचा मोदी सरकारला टोला
-
जलयुक्त शिवारला क्लीन चीट देण्याचा प्रश्नच नाही; ठाकरे सरकार कडून मोठा खुलासा