ज्येष्ठ अभिनेते युसूफ हुसैन यांचं निधन; हंसल मेहता यांची भावनिक पोस्ट

1

मुंबई: बॉलिवूड अभिनेते युसुफ हुसेन यांचे निधन झाले. निर्माते आणि युसुफ यांचे जावई हंसल मेहता यांनी सोशल मीडियावरुन युसुफ हुसेन यांच्या निधनाची माहिती दिली. हंसल मेहता यांनी एक भावूक पोस्ट लिहून त्यांच्याविषयीच्या भावना व्यक्त केल्या.

युसुफ हुसेन यांनी रईस, धूम २, दिल चाहता है, ओह माय गॉड, विवाह, राज, हजारों ख्वाइशे ऐसी, शाहिद, क्रिश ३, दबंग ३, द ताश्कंद फाइल्स, जलेबी, खोया खोया चांद, क्रेजी कुक्कड फॅमिली, रोड टू संगम या सिनेमांमध्ये तसेच सीआयडी, तुम बिन जाऊ कहां, कुमकुम : एक प्यारा सा बंधन, श्श्शू… कोई है, मुल्ला नसरुद्दीन या टीव्ही मालिकांमध्ये त्यांनी भूमिका केल्या होत्या.

काय म्हणाले हंसल मेहता?

‘मी शाहिदचे दोन भाग पूर्ण केले होते आणि आम्ही थांबलो होतो. मी अडचणीमध्ये होतो. दिग्दर्शक म्हणून माझं करिअर संपण्याच्या मार्गावर होतं. त्याचवेळी युसूफ हुसैन आले आणि म्हणाले की, ‘माझ्याकडे फिक्स डिपॉझिट आहे.’ तू अडचणीत असशील तर ते माझ्या काही कामाचे नाही. त्यानंतर त्यांनी साईन करून एक चेक मला दिला. शाहिद चित्रपट पूर्ण झाला. असे होते युसूफ हुसैन! माझे सासरे नाही, तर माझे वडील. आयुष्याचं अस्तित्व असतं तर ते त्यांच्या रुपात असतं.’

‘आज ते गेले. स्वर्गातील सर्व मुलींना जगातील सर्वात सुंदर मुलगी आणि प्रत्येक पुरूषाला चिरतरुण असल्याचं सांगण्यासाठी ते निघून गेले. युसूफ साहेब मी या नव्या आयुष्यासाठी तुमचा खूप आभारी आहे. आज मी खरंच अनाथ झालो आहे. आता आयुष्य पहिल्यासारखं नाही राहणार. मला तुमची खूप आठवण येईल. माझी उर्दू खराबच राहणार आणि हा लव यू लव यू’, असं हंसल मेहता यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

Read Also :

Get real time updates directly on you device, subscribe now.