मी ही मराठी माणूसच होतो ना, मग अडीज वर्ष तुरुंगात कशाला ठेवलं? -छगन भुजबळ

पुणे: मी ही मराठी माणूसच होतो ना, मग अडीज वर्ष तुरुंगात कशाला ठेवलं? तेव्हा कुठे गेला होता मराठी माणूस? आणि आता कोर्ट सांगत आहे की त्यांनी काहीच केलं नाही असा टोला अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी भाजपला लगावला आहे. बहुचर्चित असणाऱ्या आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे हे वादाच्या भोवऱ्यात आहे, याबाबत समीर वानखेडे यांच्या पत्नी आणि अभिनेत्री क्रांती रेडकरने मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून मराठी माणसाला न्याय मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.

यावर राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. मी ही मराठी माणूसच होतो ना, मग अडीज वर्ष तुरुंगात कशाला ठेवलं? तेव्हा कुठे गेला होता मराठी माणूस? असे सवाल भुजबळांनी उपस्थित केले आहेत. भुजबळ पुण्यात पत्रकारांशी बोलत होते.

मी पहिल्यांदा ऐकलं की लाडाने दाऊद म्हणतात, आमच्याकडे अहो जा हो, मुन्नू ,टून्नू अशी हाक मारतात, वानखडे यांच्या वडिलांना त्यांची आई लाडाने दाउद अशी हाक मारायची यावर भाष्य करताना भुजबळांनी अशी मिश्कील टिपणी केली.

तसेच या संपूर्ण प्रकरणात रेड खरी होती का? समीर वानखेडे यांनी जातीचे आरक्षण घेऊन भारत सरकारला फसवलं आहे का? असे अनेक प्रश्न उपस्थित करीत, या सगळ्या बाबी तपासात समोर येतीलच असं सांगितलं आहे. दरम्यान, नवाब मलिक याप्रकरणी सर्व पुराव्यासह गोष्टी समोर आणत आहेत. त्यामुळे सत्याला राष्ट्रवादीचा पाठिंबा आहे असंही भुजबळ यावेळी म्हणाले.

Read Also :