माझ्या पतीला शहीदाचा दर्जा द्यावा, पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील मृत शुभम द्विवेदी यांच्या पत्नीची सरकारकडे मागणी

154

कानपुर : जम्मू काश्मीर येथील पहलगाम भागात झालेल्या दहशतवादी हल्ल्यात भारतातील २८ नागरिकांचा मृत्यू झाला. धर्म विचारून हिंदू असल्यामुळे या निष्पाप नागरिकांचा जीव या क्रूर दहशतवाद्यांनी घेतला. भारतामध्ये झालेल्या या हल्ल्याची जगातील सर्व देशांकडून निंदा करण्यात आली तसेच निषेध व्यक्त करण्यात आला. या दहशतवादी हल्ल्याला जशासतसे उत्तर देण्यात यावे आणि कायमचा बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी या घटनेमध्ये मृत पावलेल्या नागरिकांच्या कुटुंबियांच्या वतीने तसेच संपूर्ण भारतीयांच्या वतीने करण्यात येत आहे. महाराष्ट्रासह उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश, कर्नाटक, गुजरात, हरयाणा, केरळ तसेच चंदीगड,ओरिसा, पश्चिम बंगाल राज्यातील नागरिक या हल्ल्यामध्ये मारले गेले आहेत. मृत व्यक्तींच्या कुटुंबियांचे सांत्वन पंतप्रधान मोदी तसेच राज्यातील मुख्यमंत्र्यांकडून करण्यात आले असून दहशतवादाला सडेतोड उत्तर देण्यात येईल असा विश्वास देखील देण्यात आला आहे.

या दहशतवादी हल्ल्यातील प्रथम मृत पावलेले उत्तर प्रदेश मधील कानपुर येथील शुभम द्विवेदी यांच्या पत्नी यांनी भारत सरकारकडे एक महत्वपूर्ण मागणी केली आहे. त्या म्हणाल्या कि “लोक पुलवामा हल्ल्यातील पीडितांच्या कुटुंबांना विसरतात, जसे की २६/११ च्या हल्ल्यातील तसे शुभमला विसरले जाऊ नये असे आम्हाला वाटते आणि म्हणूनच मी सरकारला विनंती करते की त्याला शहीदाचा दर्जा द्यावा.शुभमला गोळी लागलेला पहिला होता, त्याचा चेहरा विद्रूप करण्यात आला होता आणि कुटुंबातील सदस्यांना त्याचा चेहरा पाहण्याची संधी मिळाली नाही.”

एएनआय या वृत्तसंस्थेशी संवाद साधताना त्यांनी आपल्या या भावना व्यक्त केल्या आहेत. आता भारत सरकार या मागणीचा गांभीर्य पूर्वक विचार करणार का ? दहशतवादाचा कायमचा बंदोबस्त मोदी सरकार करणार का ? याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.

https://x.com/ANI/status/1916352832216645710

 

Get real time updates directly on you device, subscribe now.