ऐन दिवाळीच्या तोंडावर पेट्रोलच्या दरात वाढ; मुंबईत पेट्रोल 115 रुपये पार

मुंबई: दिवाळी सणाला सुरुवात झाली असून आज वसुबारस आहे. नोव्हेंबर महिन्याच्या पहिला दिवशी पेट्रोल-डिझेलच्या दरात पुन्हा वाढ झाली आहे. महागाईनं सर्वसामान्यांचे कंबरडं मोडले आहे अशामध्ये पेट्रोल-डिझेलचे दर रोज नवा उंचाक प्रस्थापित करत आहे.

आज पुन्हा पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ झाली आहे.त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला आणखी कात्री लागली आहे. देशांतर्गत तेल कंपन्यांनी आज पुन्हा पेट्रोल-डिझेलचे नवीन दर जाहीर केले आहेत. आज पेट्रोलच्या दरात 35 पैशांनी वाढ करण्यात आली आहे. तर डिझेलच्या दरात देखील 35 पैशांची वाढ करण्यात आली आहे. देशामधील इतर शहरांपेक्षा मुंबईमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर सर्वात जास्त आहेत.

पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीमुळे देशाच्या राजधानीसह प्रमुख शहरातील पेट्रोल-डिझेलचे दर आणखी वाढले आहेत. देशाची राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोल 109.69 रुपये प्रति लिटरवर पोहचले आहे. तर डिझेल 98.42 रुपये प्रति लिटरवर पोहचले आहे. तर मुंबईमध्ये  पेट्रोल 115.50 रुपये प्रति लिटरवर पोहचले आहे. तर डिझेल 106.62 रुपये प्रति लिटरवर पोहचले आहे.

दिवाळी तोंडावर आली आहे. अशामध्ये सततच्या महागाईमुळे ऐन सणासुदीच्या दिवसांत सर्वसामान्यांचं कंबरडं मोडलं आहे. देशात पेट्रोल शंभरी पार झाले आहे त्यापाठोपाठ आता डिझेल देखील शंभरी पार होताना दिसत आहे. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, जर सरकारने वेळीच योग्य पावलं उचलली नाही तर लवकरच पेट्रोलचे दर 120 रुपये पार होईल.

Read Also :