सलग सातव्या दिवशी पेट्रोलच्या दरात वाढ, जाणून घ्या आजचे दर

मुंबई: ऐन दिवाळीत महागाईनं आधीच सर्वसामान्यांचं कंबरडं मोडलं असताना पेट्रोल-डिझेलच्या दरात सातव्या दिवशी वाढ झाली आहे. मंगळवारी पेट्रोल-डिझेलच्या दरात 35 पैशांनी वाढ झाली. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला आणखी कात्री लागली आहे. पेट्रोलियम कंपन्यांनी आज पुन्हा पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर केले आहेत.

पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीमुळे देशाच्या राजधानीसह प्रमुख शहरातील पेट्रोल-डिझेलचे दर आणखी वाढले आहेत. देशाची राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोल 110.69 रुपये प्रति लिटरवर पोहचलं आहे. तर डिझेल 98.42 रुपये प्रति लिटरवर पोहचले आहे. तर मुंबईमध्ये पेट्रोल 115.50 रुपये प्रति लिटरवर पोहचले आहे. तर डिझेल 106.62 रुपये प्रति लिटरवर पोहचले आहे.

देशात पेट्रोल शंभरी पार झाले आहे त्यापाठोपाठ आता डिझेल देखील शंभरी पार होताना दिसत आहे. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, सरकारने वेळीच योग्य पावलं उचलली नाही तर लवकरच पेट्रोलचे दर 130 रुपये पार होईल. आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलांच्या किमतीला अखेर ब्रेक लागला आहे.

देशात केंद्र आणि राज्य सरकारकडून लावण्यात आलेल्या एक्साइज ड्यूटीमुळे पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रचंड मोठी वाढ झाली आहे. मागील सात दिवसात सलग दरवाढ झाली असून 2.45 रुपयांनी पेट्रोल महागलं आहे. तर डिझेल 2 रुपये प्रति लिटर महाग झालं आहे.

काही राज्यातील पेट्रोलचे दर

मुंबई – 115.85, दिल्ली – 110.04, कोलकाता – 110.49, चेन्नई – 106.66

काही राज्यातील डिझेलचे दर

मुंबई – 106.52, दिल्ली – 98.42, कोलकाता – 101.56, चेन्नई – 102.59

Read Also :