मलिकसाहेब, तुम्हाला हे सगळं झेपेल का? चंद्रकांत पाटलांचा खोचक सवाल

10

मुंबई: भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रसचे मंत्री नवाब मलिक यांच्यात आता चांगलीच जुंपल्याचं दिसून येत आहे. ‘नवाब मलिकांसारखे नेते आपल्या खिशात असतात’, असं वक्तव्य करणाऱ्या चंद्रकांत पाटील यांनी आता पुन्हा एकदा नवाब मलिक यांच्यावर निशाणा साधला आहे.

‘कुणाच्या तरी खिशात राहण्याची, कुणाच्या तरी इशाऱ्यावरून बोलण्याची नवाब मलिकसाहेबांना सवयच असावी. तुमचं खिशात ठेवून दाखवाच हे आव्हान स्वीकारलं. माझ्या खिशात दिसेल संघाची शिस्त, शुचिता, आदरभावना आणि योग्य मूल्यांसह योग्य व्यक्तींप्रती निष्ठा. मलिकसाहेब, हे सगळं झेपेल तुम्हाला?’ असं ट्वीट करुन चंद्रकांत पाटील यांनी पुन्हा एकदा नवाब मलिक यांनी आव्हान दिलं आहे.

नवाब मलिक यांच्यासारखे नेते माझ्या खिशात राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे. ‘चंद्रकांत पाटील मला कधी खिशात टाकताय याची वाट पाहतोय, मग मी त्यांच्या खिशात काय काय आहे हे जनतेसमोर आणणार आहे’ अशी प्रतिक्रिया नवाब मलिक यांनी दिली होती. ‘भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील सांगत आहेत मी नवाब मलिक यांना खिशात ठेवतो. त्यांचा खिसा इतका मोठा आहे हे मला माहीत नाही. मी वाट बघतोय ते कधी त्यांच्या खिशात टाकत आहेत. मी त्यांच्या खिशात काय-काय आहे हे जनतेसमोर आणणार आहे त्यासाठी चंद्रकांतजी मला तुमच्या खिशात टाका.’

‘भाजपचे मोठमोठे नेते, त्यांच्याजवळचे लोकं एनसीबीच्या कार्यालयात जातात. ते एनसीबी अधिकाऱ्यांना भेटत आहेत. काही भाजपचे नेते यांचे राईट हँड समीर वानखेडेला भेटत आहेत, हे मी जबाबदारीने सांगतोय. या हालचाली वाढल्या आहेत. पोपट पिंजऱ्यात गेला तर आणखी अनेक गुपितं बाहेर येतील म्हणून जीन असलेले भाजपाचे लोक घाबरायला लागला आहेत. हिवाळी अधिवेशनात मोठमोठे नावं समोर येणार आहेत.’ असं मलिक म्हणाले होते.

दरम्यान, आता नवाब मलिक आणि चंद्रकांत पाटील यांच्यात पुन्हा एकदा तूतू-मैमै पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून आर्यन खान ड्रग्स प्रकरणी नवाब मलिक हे NCB आणि भाजपवर सातत्याने गंभीर आरोप करत आहेत. अशावेळी आता चंद्रकांत पाटलांनी नवाब मलिक यांना प्रत्युत्तर देणं सुरु केलं आहे. त्यामुळे आता पुढील काही दिवस पुन्हा आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

Read Also :

Get real time updates directly on you device, subscribe now.