माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंग पुन्हा एकदा मैदानात उतरणार

मुंबई: भारतीय क्रिकेट संघाचा ३९ वर्षीय माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंग ने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ शेअर करत त्याने लवकरच मैदानात उतरणार असल्याचा म्हटलं आहे. पण तो कोणत्या टूर्नामेंटसाठी मैदानात उतरणार आहे याचा खुलासा त्याने अद्याप केलेला नाही.

दरम्यान युवराज सिंग यानं एक आश्चर्यकारक निर्णय घेतला आहे. युवराज सिंगनं मैदानावर परतण्याचा निर्णय घेतला आहे. युवराज सिंह यानं इन्स्टाग्रामवर पोस्ट करत फेब्रुवारी २०२२ मध्ये क्रिकेटच्या मैदानावर परतणार असल्याचं जाहीर केलं आहे. आपल्या क्रिकेटचाहत्यांच्या मागणीवरुन त्याने हा निर्णय घेतला आहे.

युवराजने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर आपल्या क्रिकेट कारकिर्दीतील क्षणचित्रे दाखवणारा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये त्याने लिहिले आहे की, ‘देव तुमचं नशीब लिहित असतो. लोकांची मागणी लक्षात घेता मी फेब्रुवारीत क्रिकेटच्या मैदानात परतेन अशी आशा आहे. यापेक्षा छान भावना असूच शकत नाही. तुम्ही दिलेल्या प्रेमाबद्दल आणि शुभेच्छांबद्दल आभार. या गोष्टी माझ्यासाठी महत्त्वाच्या आहेत. आमच्या संघाला पाठिंबा देत राहा. कारण एक खरा चाहता अवघड काळात संघाची साथ सोडत नाही. जय हिंद!’

युवराज सिंगने वर्ष २०१९ मध्ये इंटरनॅशनल क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली होती. निवृत्तीनंतर तो ग्लोबल कॅनडा T20 लीग आणि रोड सेफ्टी सीरीज मध्ये खेळला होता. युवराजने देशासाठी साडे अकरा हजार पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये १९०० धावा, एकदिवसीय क्रिकेटमध्ये ८७०१ आणि T20 क्रिकेटमध्ये ११७७ धावा केल्या आहेत. गोलंदाजीमध्ये त्याने कसोटी क्रिकेटमध्ये नऊ, एकदिवसीय क्रिकेटमध्ये १११ आणि T20I क्रिकेटमध्ये २८ विकेट घेतल्या आहेत.

Read Also :

Get real time updates directly on you device, subscribe now.

error: Content is protected !!