फटाके जरूर फोडा पण धूर काढू नका, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा फडणवीसांना टोला

बारामती: राज्यातील राजकीय वर्तुळात महाविकास आघाडीतील नेते आणि विरोधी पक्ष भाजपमधील नेत्यांमध्ये आरोप -प्रत्यारोपांच्या फैरी सुरु आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी फडणवीसांवर गंभीर आरोप केले आहेत. या आरोपांवर फडणवीस प्रत्युत्तर देताना नवाब मलिकांनी लवंगी फटाका लावला आता दिवाळीनंतर आपण बॉम्ब फोडून धमाका करणार असल्याचा इशारा दिला आहे.

यावर आता मुख्यमंत्र्यांनी एका कार्यक्रमादरम्यान मिश्किल टोला लगावला आहे. काही जण म्हणत आहेत फटाके फोडणार म्हणून मात्र फटाके फोडा पण धूर येऊ देऊ नका असा टोला मुख्यमंत्र्यांनी फडणवीसांना लगावला आहे.

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बारामती दौऱ्यावर आहेत. बारामती येथील एग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टच्या इन्कयुबेशन सेंटरचे उदघाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी संवाद साधला आहे. आपल्या संवादाच्या शेवटी मुख्यमंत्र्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांना टोला लगावला आहे.

फडणवीसांनी आपण दिवाळीनंतर धमाका करणार असल्याचा इशारा दिला आहे. यावर मुख्यमंत्र्यांनी दिवाळी तशी सुरु झाली आहे. काही जण म्हणत आहेत. फटाके फुटणार आहेत. बॉम्ब फुटणार आहेत. ठीक आहे आवाज येऊ द्या पण धूर काढू नका असा टोला लगावत कोरोना अजून गेला नाही असे म्हटलं आहे.

Read Also :