सोशल कनेक्शनच्या नव्या पर्वाला सुरूवात! आता फेसबुक मेटा या नावाने ओळखले जाणार

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून फेसबुक री-ब्रांडिंग करणार असल्याचं वृत्त समोर येत होतं. याला अनुसरून आता कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क जुकरबर्ग  यांनी गुरुवारी फेसबुकच्या वार्षिक कार्यक्रमात याची घोषणा केली आहे.

फेसबुक आता ‘मेटा’  या नावाने ओळखलं जाणार आहे. मेटा हे फेेसबुक कंपनीचं नवं नाव असुन ते मेटावर्स तयार करण्यास मदत करणार आहे. मेटावर्स अशी जागा आहे जिथे आपण 3D मध्ये खेळु आणि कनेक्ट करू शकत असल्याचं फेसबुककडून सांगण्यात आलं आहे. तर मेटा हे सोशल कनेक्शनचं पुढचं पर्व असल्याचंही फेसबुक अर्थात मेटाच्या वतीने सांगण्यात आलं आहे.

सोशल कनेक्शनचा नवा मार्ग असणारा मेटा एक सामूहिक प्रोजेक्ट आहे. जो जगभरातील लोकांद्वारे तयार केला जाईल आणि प्रत्येकासाठी खुला असेल. मेटामुळे आजच्या शक्यतेच्या पलीकडे जाणाऱ्या मार्गांनी आपण सोशलाईज करण्यासाठी आणि खेळण्यासाठीही सक्षम असणार असल्याचं फेसबुककडून सांगण्यात आलं आहे. येत्या काळात आम्ही अधिक उत्तम प्रकारे स्वत:ला सादर करू असा विश्वास कंपनीचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी दाखवला आहे.

फेसबुकने बनवलेल्या बाकी अॅप्स अर्थात मेसेंजर, व्हॉट्सअॅप आणि इंन्स्टाग्रामचं  नाव बदलत नसल्याचंही कंपनीकडून सांगण्यात आलं आहे. शिवाय कंपनीने त्यांची कॉर्पोरेट रचना बदलली नसल्याचंही स्पष्ट केलं आहे. लोकांपर्यंत तंत्रज्ञान पोहोचवणं आणि त्यातून नवी अर्थव्यवस्था उभारण्याचा कंपनीचा मानस असल्याचं मार्क झुकरबर्ग यांनी सांगितलं आहे.

Read Also :