कर्मचाऱ्यांनो कामावर रुजू व्हा, जनतेची गैरसोय टाळा; अनिल परब आवाहन

मुंबई: दिवाळीच्या तोंडावर प्रवाशांची गर्दी वाढणार आहे. त्यामुळे त्यांच्या प्रवासाची गैरसोय टाळण्यासाठी तसेच जनतेची एसटीवरील विश्वासर्हता जपण्यासाठी अघोषित संपावर गेलेल्या कर्मचाऱ्यांनी कामावर तातडीने रुजू व्हावे, असे आवाहन परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष ॲड. अनिल परब यांनी सोमवारी केले जनतेची एसटीशी असलेली नाळ तुटू देऊ नका, असेही त्यांची सांगितले.

दिवाळीचा सण लक्षात घेऊन ऑक्टोबर महिन्याचे वेतन नोव्हेंबर महिन्याच्या १ तारखेला म्हणजेच दिवाळीपूर्वी देण्याची जाहीर केले होते. त्यानुसार सुधारीत महागाई भत्ता आणि घरभाडे भत्ता ऑक्टोबर २०२१ च्या वेतनासोबत तसेच दरवर्षी दिली जाणारी दिवाळी भेट  सर्व कर्मचाऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आली आहे, अशी माहिती ॲड. परब यांनी दिली.

गेली दोन वर्षे कोरोनामुळे एसटी महामंडळ प्रचंड आर्थिक गर्तेत सापडले असतानाही आतापर्यंत सर्व कर्मचाऱ्यांचे वेतन अदा करण्यात आले आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. सध्या ८५ टक्के आगारातील वाहतूक सुरुळीत सुरु असून उर्वरीत १५ टक्के आगारातील वाहतूक विस्कळीत झाली आहे. ही विस्कळीत वाहतूक पूर्ववत करण्यासाठी सर्व कर्मचाऱ्यांचे सहकार्य अपेक्षित आहे. संपावर गेलेल्या कर्मचाऱ्यांनी तातडीने आपापल्या कामावर रूजू व्हावे आणि दिवाळी सणादरम्यान सर्वसामान्य जनतेची गैरसोय टाळावी, असेही परब म्हणाले.

Read Also :

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

error: Content is protected !!