मोठी बातमी: शिवसेना नेत्याच्या घरी सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, महिला नेत्यासह 10 जण अटक

मुंबई: मागील काही दिवसांमध्ये अनेक गुन्हेगारी घटना उघडकीस आल्या आहेत. सेक्स रॅकेट सारख्या अनेक घटना समोर आल्या आहेत. समाजाला कलंकित करणाऱ्या या घटना कायमस्वरूपी हद्दपार झाल्या पाहिजेत. परंतु  अजूनही या घटना समोर येतातच. आता आणखी एक सेक्स रॅकेटचा पर्दाफाश पोलिसांनी केला आहे. विशेष म्हणजे  शिवसेना नेत्याच्या घरी असला प्रकार सुरु होता.

हा प्रकार मध्य प्रदेशातील सीहोर इथं घडला आहे. पोलिसांनी या छाप्यानंतर  घटनास्थळावरुन रोख रक्कम आणि 2कार जप्त केलेल्या आहेत. या प्रकारानंतर मोठी खळबळ उडाली आहे.  ५ मुली, ५ ग्राहकांसह महिला मॅनेजर आणि चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.  ज्या महिलेवर ही कारवाई करण्यात आली आहे ती स्वत:ला समाजसेविका असल्याचं सांगते. त्याचसोबत शिवसेनेच्या तिकीटावर नगरपालिकेची निवडणूकही तिने लढवली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांना एक टीप मिळाली आणि त्यानंतर त्यांनी अनुपमा तिवारी यांच्या घरावर छापेमारी केली.

यावेळी पोलिसांनी त्याठिकाणी सेक्स रॅकेट सुरु असल्याचं निदर्शनास आलं.   छापेमारीवेळी पोलिसांनी घेतलेल्या सीक्रेट ऑपरेशनमुळे कुणालाही तिथून पळता आलं नाही. दरम्यान या ठिकाणी  नशेचं साहित्यही जप्त केले आहे.  सर्व मुली भोपाळच्या असल्याचं सांगितलं जातं. इंदुलता नावाची महिला मॅनेजर त्यांना घेऊन येत होती.

Read Also :