मी जाहीर वचन देतो, वारकऱ्यांच्या मार्गातील अडथळे दूर करण्यासाठी सरकार सोबत असेल – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई: केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून साकार होत असलेल्या संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालखी महामार्गाचे भूमिपूजन आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हर्च्युअल पद्धतीने झालं. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व्हर्च्युअल पद्धतीने सहभागी झाले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या भाषणात पालखी मार्गामुळे वारकऱ्यांचा मार्ग सुकर होईल, असं म्हटलं. तसंच, वारकऱ्यांच्या मार्गातील अडथळे दूर करण्यासाठी महाराष्ट्र सरकार सोबत असेल, असं वचन मुख्यमंत्र्यांनी दिलं.

नितीन गडकरी आपण पुण्यकाम हाती घेतलं आहात. महाराष्ट्र सरकारकडून मदतीची अपेक्षा व्यक्त केल्या आहेत. वारकऱ्यांच्या मार्गातील अडथळे दूर करण्याची जबाबदारी आपल्या सगळ्यांची आहे. गेल्या अनेक वर्षापासून उन, वारा, पाऊस सहन करत वारकरी येत असतात. त्यांना सेवा देणं आपलं काम आहे. महाराष्ट्र सरकार पदोपदी तुमच्यासोबत आहे, असं वचन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलं.

वाखरी ते पंढरपूर मार्ग मोठे करण्याचा निर्णयासाठी मुख्यमंत्र्यांनी नितीन गडकरींचे आभार मानले. पालखी मार्गामुळे वारकऱ्यांचा मार्ग सुकर होईल. भक्तीमार्गावरून आतापर्यंत वाटचाल सुरु आहे तो मार्ग सुकर होण्यासाठी प्रयत्न केलेत, असं मुख्यमंत्री म्हणाले. परकीय आक्रमण झाल्यानंतर सुद्धा वारी सुरू राहिली. पुढील कार्यासाठी, काम लवकर होण्यासाठी, महाराष्ट्र सरकार पुढाकार घेईल, असं वचन मुख्यमंत्र्यांनी दिलं.

मी जाहीर वचन देतो महाराष्ट्र सरकारकडून कोणत्याही पावलावर कमी राहू देणार नही. प्रत्येक पावलावर तुमच्यासोबत राहू. मी स्वत: वारीचं दर्शन घेतलं आहे. काही वर्षांपूर्वी मी या वारीची फोटोग्राफी हेलिकॉप्टरमधून केली. विराट दर्शन म्हणजे काय हे मला दिसलं. डोळ्यात मावत नव्हतं एवढं मोठं दर्शन होतं. पालख्या सागराकडे वाहत आहेत असं वाटत होतं, असं मुख्यमंत्री म्हणाले.

Read Also :