जगातील पहिला मराठी-हॉलिवूड चित्रपट, ‘मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

मुंबई: जगातील पहिला मराठी-हॉलिवूड चित्रपट, मराठी आणि इंग्रजी भाषेत चित्रित होणारा पहिला मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी’ असं या चित्रपटाचं नाव असून यामध्ये अभिनेत्री सोनाली कुलकर्णी मुख्य भूमिका साकारणार आहे. या चित्रपटाचं मोशन पोस्टर नुकतंच प्रदर्शित झालं आहे.

या चित्रपटाची कथा पटकथा आणि संवाद डॉ.सुधीर कदम यांचे असून चित्रपटाचे दिग्दर्शन राहुल जनार्दन जाधव यांनी केले आहे. संगीत अवधूत गुप्ते यांचे आहे.आणि या चित्रपटात छत्रपती ताराराणी यांची भूमिका अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनी साकारली आहे. सोनालीने भाऊबीजेच्या दिवशी सिनेमाचं पहिलं मोशन पोस्टर तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहे.

प्लॅनेट मराठीचे संस्थापक अक्षय बर्दापूरकर आणि गोल्डन रेशियो फिल्म्स यांच्या प्रयत्नातून यूनाइडेड किंग्डम मधील ‘ब्लॅक हँगर स्टुडिओ ‘आणि ‘ओरेवो स्टुडिओ हे ‘मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी या सिनेमाच्या माध्यमातून मराठीमध्ये पदार्पण करण्याची पहिलीच वेळ आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाचे चित्रीकरण आणि तांत्रिक बाबी लंडन मध्ये होणार असून हा हॉलीवूडचा पहिला मराठी चित्रपट असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.

हा चित्रपट आता मराठी भाषेसह इंग्रजी भाषेत देखील चित्रित होणार त्यामुळे आता हा चित्रपट साता समुद्रापलीकडे पोहचणार असल्याचे सांगितले आहे. या चित्रपटात उत्तम दर्जाचे व्हीएफएक्स आणि ग्राफिक्स असून महाराष्ट्राचा गौरवशाली इतिहास प्रेक्षक मोठ्या पडद्यावर अनुभवतील. लोकांसमोर आपल्या महाराष्ट्राची वीरगाथा आणून महाराष्ट्राचा इतिहास सातासमुद्रापलीकडे लोकांना कळवा या साठी प्लॅनेट मराठी आणि संपूर्ण चित्रपटाची टीम खूप मेहनत घेत आहे.

Read Also :

Get real time updates directly on you device, subscribe now.

error: Content is protected !!