पंढरीच्या दिशेने जाणारे रस्ते भागवत धर्माची पताका उंचावणारे – पंतप्रधान नरेंद्र मोदी
मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (सोमवार ८ नोव्हेंबर २०२१) देशातील विविध राष्ट्रीय महामार्ग आणि रस्ते प्रकल्पांचा शुभारंभ व्हिडीओ कॉन्फरन्स पद्धतीने केला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठीमध्येही भाषण केलं आहे. पंढरपूरच्या दिशेने जाणारे मार्ग हे भागवत धर्माचा पताका उंचवणारे महाद्वार ठरतील असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
दोन दिवसांपुर्वी केदारनाथमध्ये शंकराचार्यांची पूजा केल्यानंतर आता विठ्ठलाने तुमच्यासोबत मला जोडलं आहे. तसेच पंढरपूरशी माझे फार जवळचे संबंध असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. पंढरपूरची अनुभूती अलौकीक आहे. वारीमध्ये स्त्रीशक्तीचा मोठा सहभाग असतो असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रामकृष्ण हरी म्हणत आपल्या भाषणाला सुरुवात केली. यानंतर मोदी विठ्ठलाने तुमच्यासोबत मला जोडलं यापेक्षा जास्त आनंद कशात असू शकतो असे म्हणाले. पंढरपूरला आनंदाचे स्वरुप असून आज सेवेचा आनंद आहे. मला अतिशय आनंद होत आह की, संत ज्ञानोबा माऊली आणि संत तुकाराम पालखी मार्गाचे उद्घाटन होत आहे. रस्ते हे विकासाचे द्वार असतात. तसेच पंढरपूरच्या दिशेने जाणारे हे मार्ग भागवत धर्माचा पताका आणि उंच फडकणारे महाद्वार ठरतील. पंढरपूरसारख्या मार्गाकडे जाणारे हे द्वार महाद्वार ठरतील असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
पंढरपूर पालखी मार्गाचे भूमीपूजन करण्यात आले. हे काम ३ टप्प्यात करण्यात येणार असल्याची माहिती मोदींनी दिली आहे. पहिल्या टप्यात ३५० किमी हायवे करण्यात येणार असून यासाठी ११ हजार करोड रुपयांचा खर्च करण्यात येणार आहे. या दोन्ही हायवेच्या बाजूला पालखी यात्रेसाठी पायी चालण्यासाठी विशेष मार्ग बनवण्यात येणार आहेत.
पंढरपूरला जोडणारे सव्वा दोनशे किलोमीटर हायवेचे शुभारंभ आणि लोकार्पण करण्यात आले आहे. बाराशे करोड खर्च करण्यात आले आहे. हे मार्ग पंढरपूरला जाण्यासाठी मदत करतील. महामार्ग या क्षेत्राचा विकास करणारे माध्यम बनतील. यासोबत दक्षिण भारताची कनेक्टिव्हिटी अधिक चांगली झाली आहे. यामुळे पंढरपूरला अनेक भक्त येतील असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
Read Also :
-
जगातील पहिला मराठी-हॉलिवूड चित्रपट, ‘मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी’…
-
अरे वेड्या, भाजप महाराष्ट्राच्या मुंबईच्या मातीत तयार झालेला पक्ष आहे- देवेंद्र…
-
मी जाहीर वचन देतो, वारकऱ्यांच्या मार्गातील अडथळे दूर करण्यासाठी सरकार सोबत असेल…
-
एसटीच्या संपाला ठाकरे सरकार कारणीभूत; राधाकृष्ण विखे पाटलांची राज्य सरकारवर टीका